‘खुलता कळी खुलेना’ फेम मयुरी देशमुखची पुन्हा छोट्या पडद्यावर एन्ट्री; ‘या’ मालिकेत दिसणार महत्वपूर्ण भूमिकेत

‘खुलता कळी खुलेना’ फेम मयुरी देशमुखची पुन्हा छोट्या पडद्यावर एन्ट्री; ‘या’ मालिकेत दिसणार महत्वपूर्ण भूमिकेत

‘खुलता कळी खुलेना’ फेम अभिनेत्री मयुरी देशमुख आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्टार प्रवाहच्या ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेत मयुरी देशमुख एन्ट्री करणार आहे. सहा वर्षांनंतर मयुरी मराठी मालिकेत दिसणार आहे. मयुरी देशमुखच्या येण्याने मालिकेत धमाकेदार ट्विस्ट येणार आहे. स्टार प्रवाहची मन धागा धागा जोडते नवा मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेत मयुरी देशमुखची एण्ट्री होणार असून सुखदा ही व्यक्तिरेखा मयुरी साकारणार आहे. सुखदाच्या येण्याने आनंदी-सार्थकच्या आयुष्यातही नवं वळण येणार आहे.

मयुरी देशमुख एक उत्तम अभिनेत्री आहे. मालिका आणि सिनेमाच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं आहे. स्टार प्रवाहसोबतची तिची ही पहिलीच मालिका. सुखदा या व्यक्तिरेखविषयी सांगताना मयुरीला वेगवेगळे अनुभव आले. मी जवळपास सहा वर्षांनंतर मराठी मालिका विश्वात पुनरागमन करतेय. खरं सांगायचं तर खुप उत्सुकता आहे. शक्यतो भूमिकेत तोच तोच पणा येऊ नये, यासाठी माझा प्रयत्न असतो. सुखदा हे पात्र अतिशय सुंदररित्या लिहिलं गेलं आहे, असं मयुरी म्हणाली आहे.

व्यक्तिरेखेच्या प्रेमात पडले- मयुरी

आयुष्य भरभरुन जगणारी, बडबडी आणि अतिशय सकारात्मक अतिशय ही व्यक्तिरेखा आहे. या पात्राविषयी ऐकताक्षणीच मी प्रेमात पडले. स्टार प्रवाहसोबत काम करण्याची इच्छा देखील पूर्ण होतेय. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी ‘मन धागा धागा जोडते नवा’ ही मालिका जरूर पाहावी. आमच्या कामावर प्रेक्षकांनी प्रेम कराव, एवढीच इच्छा आहे, असंही मयुरीने म्हटलं आहे.

कोण आहे मयुरी देशमुख?

‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेमुळे मयुरी देशमुख घराघरात पोहोचली. या मालिकेतील तिच्या कामाचं प्रचंड कौतुकही झालं. त्यानंतर मयुरीने हिंदी मालिकांमध्ये काम केलं. स्टार प्लसवरच्या ‘इमली’ या मालिकेत मयुरीने काम केलंय. या मालिकेत तिने खलनायिकेची भूमिका केली होती. शिवाय ‘लग्न कल्लोळ’ सिनेमातही तिने काम केलंय. तिच्या अभिनयाचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं आहे. आता ती ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुखदाच्या येण्याने सार्थक-आनंदीच्या आयुष्यात काय बदल घडतील हे पुढच्या भागांमधून उलगडेल.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;