शाहरुख खानला भेटूच देत नाही, ज्येष्ठ अभिनेत्रीने पूजा ददलानीवर केला आरोप

शाहरुख खानला भेटूच देत नाही, ज्येष्ठ अभिनेत्रीने पूजा ददलानीवर केला आरोप

बॉलीवूड किंग शाहरुख खान आपल्या उदारतेसाठी प्रसिद्ध आहे. मात्र शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीबाबत बॉलीवूडमध्ये अनेकांचे तिच्याबाबत मत चांगले नाही. नुकतेच ज्येष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल यांनी आपल्या एका मुलाखतीत पूजा ददलानीबद्दल असे काही सांगितले की, त्यानंतर चाहते प्रचंड नाराज झाले आहेत. फरीदा म्हणाल्या, पूजा ददलानी शाहरुखला भेटूच देत नाही असा आरोप केला आहे.

नुकतेच संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी’ या वेबसिरीजमध्ये फरीदा जलाल दिसल्या. दरम्यान त्यांनी एका मुलाखतीत खुलासा केला की, त्या आता शाहरुख खानच्या संपर्कात नाही. जेव्हा माझ्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाली तेव्हा शाहरुखशी बोलणे झाले होते, पण त्यानंतर ते त्याच्याशी कधीच बोलले नाहीत. फरीदान म्हणाल्या की, जेव्हा मी शाहरुखला फोन करते तेव्हा त्याची मॅनेजर फोन उचलते. माझ्याशी रुक्ष बोलते आणि माझा फोन शाहरुखपर्यंत पोहोचवतच नाही.

फरीदा म्हणाल्या की, त्यांना शाहरुखला सांगायचे आहे की तो खूप चांगले काम करतोय, त्याची मुलेही चांगले काम करत आहेत आणि हे सर्व पाहून मला फार आनंद होत आहे. शाहरुख त्यांच्यासाठी त्यांच्या मुलासारखा आहे. शाहरुख खान आणि फरीदा जलाल यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ‘कुछ कुछ होता है’मध्ये त्यांनी शाहरुख खानच्या आईची भूमिका केली होती. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’मध्ये त्यांनी काजोलच्या आईच्या भूमिकेत दिसली होती. तर ‘कभी खुशी कभी गम’मध्ये त्या सईदाच्या भूमिकेत दिसल्या होत्या. शाहरुख आणि फरीदा यांचे ट्युनिंग खूप सुंदर होतं, पण आता फरीदा यांना इच्छा असूनही त्याच्याशी बोलता येत नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;