रत्नागिरीत वाळूमाफियांच्या हल्ल्यानंतर प्रशासनाला जाग; पांढरा समुद्र येथे पाऊण ब्रास वाळू पकडली

रत्नागिरीत वाळूमाफियांच्या हल्ल्यानंतर प्रशासनाला जाग; पांढरा समुद्र येथे पाऊण ब्रास वाळू पकडली

रत्नागिरीच्या उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांच्यावर वाळूमाफियांनी हल्ला केल्याची घटना घडल्यानंतर महसूल प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. मंडळ अधिकाऱ्यांनी कारवाई करत पांढरा समुद्र येथे वाळू भरलेली एक चारचाकी गाडी पकडली. या गाडीमध्ये पाऊण ब्रास वाळू सापडली आहे. गाडीमालकाला 37 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

पांढरा समुद्र 7 जून रोजी मॉर्निंगवॉकला गेलेल्या उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम या समुद्रकिनाऱ्यावर मोबाईलवर शूटिंग करत होत्या. त्यावेळी समुद्रावर वाळूमाफिया वाळू चोरत होते. त्यांना संशय आला की उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांनी मोबाईलवर आपले चित्रीकरण केले आहे. त्यावेळी त्यांनी त्यांचा मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न केला. तो मोबाईल हिसकावण्यासाठी वाळूमाफिया पुढे येताच नॅशनल कराटे चॅम्पियन असलेल्या हर्षलता गेडाम यांनी एक किक मारुन त्याला जमिनीवर पाडले. त्यानंतर दुसरी व्यक्ती फावडे घेऊन त्यांच्या अंगावर आली. त्यांनी त्याचा हल्ला चुकवून त्यालाही खाली पाडले. या हल्ल्याची त्यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गेली अनेक वर्षे पांढऱ्या समुद्रावर सुरु असलेल्या वाळू उत्खननाकडे महसूल प्रशासन दुर्लक्ष करत होते. त्यांना या घटनेनंतर जाग आली आहे. मंडळ अधिकाऱ्यांनी पांढरा समुद्र येथे वाळू भरलेली पिकअप बोलेरो पकडली. गाडी मालक राजेश सहदेव राडये याला महसूल विभागाने नोटीस बजावत 37 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावला आहे. या गाडीमध्ये पाऊण ब्रास वाळू सापडली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;