जामखेडजवळ एसटी बस चारचाकीचा अपघात; दोघांचा मृत्यू, तीन गंभीर जखमी

जामखेडजवळ एसटी बस चारचाकीचा अपघात; दोघांचा मृत्यू, तीन गंभीर जखमी

जामखेड खर्डा रोडवरील पाच कि.मी.अंतरावरील बटेवाडी शिवारात पेट्रोलपंपाजवळ देवदर्शनाहून परतणाऱ्या तरुणांच्या चारचाकी वाहनाची आणि एसटीबसची धडक झाली. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अक्कलकोट, तुळजापूर येथून देवदर्शन करुन पततत आसताना जामखेडजवळ हा भीषण अपघात झाला आहे. आपघातील पाचहीजण नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता या गावचे रहिवासी आहेत. विजय गंगाधर गव्हाणे (वय 24), पंकज सुरेश तांबे (वय 24) यांचा मृतांमध्ये समावेश आहे.

कोपरगाव डेपोची शिर्डी-हैदराबाद ही बस हैदराबादकडे जात होती. त्याचवेळी अक्कलकोट व तुळजापूर येथून देवदर्शन करुन पाच तरुण चारचाकीने नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता या गावी जात होते. सोमवारी मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास या एसटी बस व चारचाकी वहानाची जामखेड खर्डा रोडवरील पेट्रोलपंपाजवळ धडक झाली. यानंतर आपघातील पाच जखमींना तातडीने जामखेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले होते. मात्र रस्त्यातच विजय गंगाधर गव्हाणे व पंकज सुरेश तांबे या दोघांचा मृत्यू झाला. तर मयुर संतोष कोळी (वय 18), सचिन दिलिप गीते (वय 30) व अमोल बबन डोंगरे (वय 28, तिघे रा.राहणार वडगाव गुप्ता, ता. नगर) हे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलीस ठाण्याचे सपोनि गौतम तायडे, पो कॉ. देविदास पळसे, हनुमंत अडसुळ, दिगंबर भोरे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात नेण्यात मदत केली. या अपघातात एकाच गावातील दोघांचा मृत्यू झाला असल्याने वडगाव गुप्ता गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर बसचालक सचिन विष्णू राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग विवेकानंद वाखारे, जामखेड पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी भेट दिली आहे. याबाबत सध्या जामखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;