निधनानंतर अभिनेत्रीच्या पोटात डॉक्टरांना दिसली धक्कादायक गोष्ट, शवविच्छेदनानंतर कुटुंबियांनी नाही स्वीकारला मृतदेह

निधनानंतर अभिनेत्रीच्या पोटात डॉक्टरांना दिसली धक्कादायक गोष्ट, शवविच्छेदनानंतर कुटुंबियांनी नाही स्वीकारला मृतदेह

झगमगत्या विश्वातील ग्लॅमर, रॉयल आयुष्य, पैसा, प्रसिद्धी… अशा अनेक गोष्टी सामान्य जनतेला आकर्षित करत असतात. पण अनेकादा समोर दिसणारी बाजू वेगळी असते आणि सत्य फार कोणाला माहिती देखील नसतं. बॉलिवूडच्या अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी होती. पण अभिनेत्रींचा अंत मात्र फार वाईट झाला. कुटुंबियांकडून अभिनेत्रींवर अंत्यसंस्कार देखील झाले नाहीत. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री परवीन बाबी…

परवीन बाबी यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण परवीन बाबी डायबिटीज आणि सिजोफ्रेनिया नावाच्या गंभीर आजाराचा सामना करत होत्या हे सत्य समोर आलं नव्हतं… आजारामुळे बॉयफ्रेंडने देखील परवीन बाबी यांची साथ सोडली.. असं देखील सांगितलं जातं… तेव्हा महेश भट्ट आणि परवीन एकत्र होते.

दरम्यान, 1983 मध्ये परवीन बाबी एका सिनेमाचं शुटिंग करत होत्या. तेव्हा 30 जुलै 2024 मध्ये सेटवरुन गायब झाल्या. तेव्हा परवीन बाबी यांना अंडरवर्ल्डच्या लोकांसोबत पाहाण्यात आलं आहे… अशा देखील चर्चा जोर धरू लागल्या होत्या. अखेर 1984 मध्ये जेव्हा परवीन बाबी यांना न्यूयॉर्क विमानतळावर स्पॉट करण्यात आलं, तेव्हा पोलिसांना त्यांना ताब्यात घेतले आणि वेड्यांच्या इस्पितळात दाखल करण्यात आलं. त्यानंतर 6 वर्षानंतर म्हणजे 1989 मध्ये परवीन बाबी मुंबईत आल्या…

मुंबईत परतल्यानंतर परवीन बाबी जुहू येथील घरात एकट्याच राहायच्या. लोकांसोबत त्या फक्त फोनवरून संपर्क साधायच्या. शिवाय बॉलिवूड सेलिब्रिटींना देखील त्यांच्यापासून दूर राहाणं योग्य समजलं. अखेर 20 जानेवारी रोजी परवीन बाबी यांचं निधन झाल्याची बातमी समोर आली. परवीन यांचं निधन देखील धक्कादायक होतं. त्याच्या घराबाहेर तीन दिवसांचं दूध, न्यूजपेपर तसंच पडलं होतं. शेजाऱ्यांच्या ही गोष्ट लक्षात आली. शिवाय त्यांच्या घरातून दुर्गंधी देखील येऊ लागली होती.

परवीन बाबी यांच्या निधनला 72 तसांपेक्षा अधिक काळ लोटला होता. पण त्यांचे कुंटुंबिय आले नाही. शेवटच्या क्षणी देखील परवीन बाबी यांच्यासोबत कोणीही नव्हतं… अशात शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं, पोलीस घटस्थळी आले आणि त्यांनी दरवाजा तोडला. समोर परवीन बाबी यांचं मृतदेह पडलेला होता.

त्यानंतर परवीन बाबी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. तेव्हा डॉक्टरांच्या समोर धक्कादायक गोष्ट आली. त्यांच्या पोटात एकही अन्नाचा कण नव्हता. तीन ते चार दिवसांपासून त्या जेवल्या नव्हत्या. पण त्यांच्या पोटात डॉक्टरांना फक्त दारु आढळली… रिपोर्टनुसार, परवीन बाबी यांचं निधन भूक, डायबिटीज आणि अवयव निकामी झाल्यामुळे झाला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;