मोदी सरकारमधील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री आहे ‘कंगनाचा हिरो…’, चर्चांना उधाण

मोदी सरकारमधील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री आहे ‘कंगनाचा हिरो…’, चर्चांना उधाण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 9 जून 2024 रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत सरकार स्थापन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळात सामिल असलेल्या सर्व मंत्र्यांनी शपथ घेतली. नवं सरकार स्थापन होत असताना अनेक मंत्री कुर्ता-पायजमा अशा पारंपरिक पोशाखात शपथ घेण्यासाठी पोहोचले. पण एक मंत्री असे होते ज्यांनी काळ्या रंगाच्या कोट-पँटमध्ये आणि कपाळावर लांबलचक टिळक लावून शपथ घेण्यासाठी आले… ते शपथ घेण्यासाठी आले तेव्हा जमलेल्या सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे येवून थांबल्या होत्या…

सध्या ज्या मंत्र्याची चर्चा रंगत आहे ते दुसरे तिसरे कोणी नाही तर, अभिनेत्री कंगना रनौत यांचे हिरो आहे. ते मोदी सरकारमधील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री आहेत. कॅबिनेट मंत्री चिराग पासवान आहेत. लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि हाजीपूरचे लोकसभा खासदार चिराग पासवान हे मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री बनले आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Chirag Paswan (@ichiragpaswan)

दिसायला प्रचंड हँडसम चिराग पासवान जेव्हा शपथ घेण्यासाठी मंचावर पोहोचले, तेव्हा एखाद्या बॉलिवूड अभिनेत्या प्रमाणे दिसत होते. एक काळ असा होता जेव्हा चिराग पासवान यांनी अभिनय विश्वात देखील स्वतःचं नशीब आजमावलं होतं. ‘मिले ना मिले हम’ सिनेमात चिराग पासवान झळकले होते.

सिनेमात चिराग पासवान यांच्यासोबत अभिनेत्री कंगना रनौत यांनी भूमिका साकारली होती. 2011 मध्ये सिनेमा प्रदर्शित झाला होता. पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेल ठरला. पण आता सिनेमातील अनेक सीन सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त चिराग पासवान यांची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर देखील कंगना हिने मागे वळून पाहिलं नाही. पण चिराग पासवान यांनी मात्र राजकारणात प्रवेश केला आणि 3 वर्ष मेहनत केल्यानंतर 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत जमुई मतदार संघातून विजय मिळवला. त्यानंतर 2019 मध्ये चिराग पुन्हा एकदा जमुई जागेवरून खासदार म्हणून निवडून आले आणि आता 2024 मध्ये मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री बनले आहेत.

चिराग पासवान यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, ते रामविलास पासवान यांचे पूत्र आहेत. यावेळी एलजेपीकडून 5 जणांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आणि चिराग यांनी पाचही जागा जिंकून पंतप्रधान मोदी यांना दिल्या. यामुळेच चिराग पासवान यांनी एनडीए सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;