…तर मीही कानाखाली मारली असती, कंगनाचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

…तर मीही कानाखाली मारली असती, कंगनाचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

नवनियुक्त खासदार, अभिनेत्री कंगना राणावतला गुरुवारी चंदिगढ विमानतळावर सीआयएसएफच्या महिला कर्मचाऱयाने  कानशिलात लगावली. कुलविंदर कौर असे सीआयएसएफच्या महिला जवानाचे नाव आहे. कुलविंदरची आई शेतकरी आंदोलनात सहभागी झाली होती. तिच्या आईची खिल्ली कंगनाने उडवली होती. त्या रागातून कंगनाच्या कानशिलात लगावली, असे सांगणाऱया कुलविंदरचा व्हिडीओ व्हायरल झाला. मात्र आता या प्रकरणानंतर कंगनाच्या एका जुन्या इन्स्टाग्राम स्टोरीचा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. या स्क्रीनशॉटमध्ये कंगनाने 2022 च्या ऑस्कर सोहळय़ात अभिनेता विल स्मिथने कॉमेडियन ख्रिस रॉकच्या कानशिलात लगावण्याच्या कृतीचे समर्थन केले होते. त्या वेळी कंगनाने म्हटले होते की, काही मूर्खांना हसवण्यासाङ्गी कोणी माझ्या आई किंवा बहिणीच्या आजाराची खिल्ली उडवली तर मीही त्याच्या कानाखाली मारली असती. कंगनाने स्मिथ-ख्रिसच्या फोटोवर कमेंट देताना टाळय़ा वाजवण्याचा इमोजीही शेअर केला होता.

एकीकडे आईवरून बोलल्यामुळे सीआयएसएफच्या कुलविंदर कौरने कंगनाला कानाखाली मारलेली असताना ‘दुसरीकडे आपल्या आईबद्दल कुणी बोलले असते तर मीही कानाखाली मारले असते,’ असा दावा करणारा स्क्रीनशॉट व्हायरल होतोय. कंगनाच्या जुन्या इन्स्टाग्राम स्टोरीचा स्क्रीनशॉट चांगलाच व्हायरल होत असून नेटिजन्स त्यावर कमेंट्स देत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;