कळसूबाई व रतनगडावर पालींच्या 2 नव्या प्रजातींचा शोध; ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनच्या संशोधकांचे यश

कळसूबाई व रतनगडावर पालींच्या 2 नव्या प्रजातींचा शोध; ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनच्या संशोधकांचे यश

महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई व रतनगड किल्ल्यावरून गोल बुबुळांच्या प्रदेशनिष्ठ पालींच्या दोन नव्या प्रजातींचा शोध लावण्यात शिवाजी विद्यापीठ आणि ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनच्या संशोधकांनी यश मिळवले. दोन्ही प्रजाती उंच शिखरांच्या टोकांवरील बेसाल्ट दगडांच्या अधिवासात आढळतात.

संशोधनामध्ये ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनचे संशोधक तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर, इशान अगरवाल, सत्पाल गंगलमाले आणि सौरभ किनिंगे यांच्यासह शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांचा सहभाग होता. हे संशोधन शिवाजी विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागामधून सुरू असलेल्या पीएचडी संशोधनाचा भाग असून डॉ. सुनील गायकवाड त्यांचे मार्गदर्शक आहेत. नव्याने शोधलेल्या दोन्ही प्रजातींचा समावेश ‘निमास्पीस’ या कुळामधे केला आहे. गोल बुबुळे हे निमास्पीस कुळातील पालींचे महत्त्वाचे वैशिष्ट़य आहे. पाठीवरील ट़युबरकलची संख्या, मांडीवरील ग्रंथींची संख्या, पृष्ठभागाला धरून राहण्यासाठी आवश्यक बोटांवरील लॅमेल्यांची संख्या आणि वैशिष्ट़यपूर्ण जनुकीय संचांवरून या पाली एकमेकांपासून आणि कुळातील इतरांपासून वेगळ्या प्रजातीच्या ठरतात.

1100 मीटरपेक्षा अधिक उंचीवर आढळतात

निमास्पीस कुळातील पाली थंड अधिवासातील वावरासाठी ओळखल्या जातात. नव्याने शोधलेल्या दोन्ही प्रजाती 1100 मीटरपेक्षा उंच पर्वतांवरील निम-सदाहरित जंगल व कडय़ांवरील बेसाल्ट दगडांवर आढळतात.

कमी उंचीवरील गरम जागा त्यांच्यासाठी अनुकूल नाहीत. दोन्ही प्रजातींच्या आढळ क्षेत्रांमधील सरळ रेषेतील अंतर फक्त 7 किमी. आहे. रतनगड व अलंग-कळसूबाई पर्वतरांग यांच्यामध्ये असलेल्या शुष्क-सपाट प्रदेशाने या दोन पालींना एकमेकांपासून वेगळे केले आहे. या पाली संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.

कळसूबाई शिखराची जैवविविधता अधोरेखित

महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखरावरून पालीची नवी प्रजाती शोधणे ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. कळसूबाई शिखर, रतनगड आणि अलंग किल्ला या ठिकाणांना महाराष्ट्राच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. रतनगड आणि अलंग शिखरांच्या माथ्यावरील किल्ल्यांनी ऐतिहासिक काळात अनेकांना आश्रय दिला आहे. नव्या पालींसाठी या शिखरांची अग्रस्थाने अशीच आश्रयस्थाने राहिली आहेत. नवीन पालींच्या संशोधनामुळे कळसूबाई, रतनगड व अलंग शिखर या ऐतिहासिकदृष्ट़या महत्त्वाच्या परिसरातील जैवविविधतेसंदर्भातील वैशिष्ट़ये अधोरेखित झाली आहेत, असे अक्षय खांडेकर यांनी सांगितले.

पालींचे नामकरण

नगर जिह्यातील रतनगड किल्ल्यावर शोधलेल्या पालीचे नामकरण बेसाल्ट दगडांवरील मर्यादित वावरावरून ‘निमास्पीस बेसाल्टीकोला’ असे केले आहे. कळसूबाई शिखरावरून शोधलेल्या पालीचे नामकरण तिच्या आढळ क्षेत्रावरून ‘निमास्पीस कळसूबाईन्सीस’ असे केले आहे. ‘निमास्पीस कळसूबाईन्सीस’ ही प्रजाती कळसूबाई शिखर व त्याच पर्वतरांगेतील अलंग किल्ल्यावर आढळली. ही प्रजाती हिंदुस्थानी द्वीपकल्पामधील निमास्पीस कुळातील सर्वांत दक्षिणेकडील प्रजाती ठरली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;