भाजप मित्र पक्षाला कसा वागवतो हे जवळून आम्ही पाहिलंय! सुप्रिया सुळेंचा निशाणा

भाजप मित्र पक्षाला कसा वागवतो हे जवळून आम्ही पाहिलंय! सुप्रिया सुळेंचा निशाणा

नरेंद्र मोदी यांनी तिसऱयांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतलेल्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसला एकही मंत्रीपद न मिळाल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटावर हल्लाबोल केला. भाजप मित्रपक्षासोबत कसा वागतो, हे जवळून पाहिले आहे. यात नवल वाटण्यासारखे काहीच नाही असा टोला त्यांनी मारला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीच्या एकाही खासदाराला मंत्री पद मिळाले नाही. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना लक्ष्य केले.

 अजित पवार गटाला मंत्री पद मिळाले नसल्याबाबत प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या की, दुसऱयाच्या घरात ढवळाढवळ मी करत नाही. मी भाजपचे वागणे दहा वर्षे जवळून पाहिले. त्यामुळे अजित पवार यांच्या पक्षाला मंत्री पद मिळाले नाही,  यात नवल वाटायचे कारण नाही.

मंत्री पद नाही, पण मालमत्ता सुटली

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवारांनीही यावरून अजित पवार गटाला लक्ष्य केले. ते म्हणाले की, जे नेते शरद पवारांना सोडून गेले त्यांना मंत्री पद नाही, पण व्यक्तिगत खूप काही मिळाले आहे. प्रफुल्ल पटेल यांना व्यक्तिगत गिफ्ट दिले आहे. ईडीने जप्त केलेली मालमत्ता सोडविली आहे. त्यामुळे मंत्रीपद मिळाले नाही तरी व्यक्तिगत गिफ्ट मिळाले आहे. तर जे सोडून गेले आता त्यांना विधानसभा निवडणुकीत एकच पर्याय असेल ते म्हणजे राष्ट्रवादीऐवजी भाजपच्या चिन्हावर त्यांना लढावे लागेल, असेही रोहित पवारांनी नमूद केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;