‘ये रिश्ता..’च्या अभिनेत्रीचा आधी अफेअरच्या चर्चांना नकार आता थेट किसिंगचा व्हिडीओ समोर

‘ये रिश्ता..’च्या अभिनेत्रीचा आधी अफेअरच्या चर्चांना नकार आता थेट किसिंगचा व्हिडीओ समोर

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या लोकप्रिय मालिकेत नायराची भूमिका साकारलेली अभिनेत्री शिवांगी जोशी सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आहे. शिवांगीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामध्ये तिला एक प्रसिद्ध अभिनेता किस करताना दिसतोय. हे दोघं थायलंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेले होते. तिथे बॉक्सिंग मॅच बघताना शिवांगीला त्या अभिनेत्याने किसं केलं. त्यांचा हा व्हिडीओ मागून एका चाहत्याने शूट केला असून सोशल मीडियावर तो चांगलाच व्हायरल होत आहे. शिवांगीला किस करणारा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून तिचा सहकलाकार कुशल टंडन आहे. ‘बरसातें’ या मालिकेत दोघांनी एकत्र काम केलं होतं आणि तेव्हापासूनच त्यांच्या अफेअरच्या चर्चा आहेत. काही दिवसांपूर्वी शिवांगी आणि कुशल यांच्या साखरपुड्याच्याही चर्चा होत्या. मात्र दोघांनी अफेअर आणि साखरपुड्याच्या चर्चांना नाकारलं होतं.

कुशल आणि शिवांगी हे दोघं थायलंड फिरण्यासाठी गेले होते. तिथेच त्यांनी बॉक्सिंग मॅचचा आनंद घेतला. बॉक्सिंग मॅच पाहतानाचा त्यांचा फोटो आधी व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांचा किसिंग व्हिडीओ पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. या व्हिडीओमध्ये कुशल आणि शिवांगी हे दोघं मॅच बघत एकमेकांशी गप्पा मारताना दिसत आहेत. त्यादरम्यान कुशल सर्वांसमोर शिवांगीच्या गालावर किस करतो.

पहा व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by follow 👉 (@kushiv.world_)

याआधी शिवांगी आणि कुशल या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित रिलेशनशिपच्या चर्चांना फेटाळलं होतं. कुशलने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं होतं, ‘मला एक गोष्ट सांगा की माझा साखरपुडा होतोय आणि त्याबद्दल मलाच माहीत नाही? मी इथे थायलंडमध्ये मार्शिअल आर्ट्स शिकतोय. तुम्ही माझ्यासोबत असं कसं करू शकता? किमान आधी बातमीचे तथ्य तरी तपासा. तुमचे सूत्र कोण आहेत?’

शिवांगी जोशी आणि कुशल टंडन यांच्या मुख्य भूमिका असलेली ‘बरसातें’ ही मालिका गेल्या वर्षी जुलै महिन्यात सुरू झाली होती. त्यानंतर या वर्षी फेब्रुवारी महिन्यात या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला. शिवांगी आणि कुशलच्या वयात 14 वर्षांचं अंतर आहे. शिवांगी 25 वर्षांची तर कुशल 39 वर्षांचा आहे. मालिकेत एकत्र काम करताना दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. त्यांची ही केमिस्ट्री ऑफस्क्रीनसुद्धा झळकायची, म्हणून त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;