‘आई कुठे काय करते’मध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्याची एण्ट्री; 6 वर्षांनंतर मालिकेत कमबॅक
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते'मध्ये लवकरच सुप्रसिद्ध अभिनेता ऋषी सक्सेनाची एण्ट्री होणार आहे. ऋषीला याआधी प्रेक्षकांनी अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये पाहिलंय. त्याने चित्रपटातही काम केलंय. तब्बल सहा वर्षांनंतर ऋषी मराठी टेलिव्हिजन विश्वात दमदार पुनरागमन करणार आहे.
'आई कुठे काय करते' मालिकेत मिहीर शर्मा ही व्यक्तिरेखा तो साकारताना दिसेल. मिहीर शर्मा उत्तम शेफ आहे. त्याची आई अरुंधतीची खूप मोठी चाहती होती. आपल्या मुलाने अरुंधतीकडून गाणं शिकावं ही तिची इच्छा होती. आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी मिहीर अरुंधतीकडून गाण्याचे धडे गिरवणार आहे.
या भूमिकेविषयी सांगताना ऋषी म्हणाला, "स्टार प्रवाह वाहिनीसोबत काम करण्याची खूप दिवसांपासूनची इच्छा होती. अखेर ती इच्छा पूर्ण होतेय. आई कुठे काय करते ही मालिका माझीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी मालिका आहे. आपल्या आवडीच्या मालिकेत काम करायला मिळणं हा माझ्यासाठी दुग्धशर्करा योग आहे."
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List