भावनांशी खेळू नकोस…, नताशाने पोस्ट केलेला ‘तो’ फोटो, घटस्फोटाच्या चर्चांना उधाण
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज हार्दिक पांड्या गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून हार्दिक आणि पत्नी नताशा स्टँकोव्हिच यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. रिपोर्टनुसार, हार्दिक – नताशा यांच्या खासगी आयुष्यात अनेक चढ-उतार आले आहेत. शिवाय नताशा हिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एका फोटो पोस्ट करत हिंट देखील दिली आहे. ज्यामुळे घटस्फोटाच्या चर्चांना आणखी जोर आला आहे.
1 जून रोजी नताशा हिने ड्राईव्ह करताना एक बूमरँग सोशल मीडियावर शेअर केला होता. फोटो शेअर करत अभिनेत्रीने ‘हाय…’ असं लिहिलं होतं. दुसऱ्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये अभिनेत्री चहा पिताना फोटो शेअर केला होता. ज्यमध्ये नताशा हिने चाहत्यांना विचारलं, मी चाहा सांडवेल… ‘विल आई स्पिल द टी।’

सांगायचं झालं तर ही एक म्हण आहे. ज्याचा अर्थ कोणत्या तरी खास गोष्टीचा खुलासा करणे… असं होतं. पोस्टनंतर सोशल मीडियावर नताशा – हार्दिक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. चाहते यावर प्रतिक्रिया देखील देत आहेत.
एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘आता चर्चा जोर धरत आहेत…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘हार्दिकसोबत खेळी केली…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘भावनांशी खेळू नकोस…’, नताशा कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
सांगायचं झालं तर, घटस्फोटाच्या चर्चा रंगत असताना नताशा हिने इन्स्टाग्रामवर पुन्हा हार्दिक यच्यासोबत असलेले फोटो री-स्टोर केले आहेत. दोघांनी देखील रंगणाऱ्या चर्चांवर अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.
हार्दीक आणि नताशा यांचं लग्न
हार्दिक पांड्या – नताशा स्टँकोव्हिच यांना 2020 मध्ये साध्या पद्धतीत लग्न करत चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. लग्नाच्या काही महिन्यांनंतर नताशा हिने मुलगा अगस्त्य याला जन्म दिला. पांड्या कुटुंब चाहत्यांना देखील आवडत होतं. त्यानंतर 2023 मध्ये हार्दिक – नताशा यांनी मोठ्या थाटात लग्न केलं.
एवढंच नाहीतर, हार्दिक, नताशा हिच्या कुटुंबियांना देखील लग्नाच्या दोन वर्षांनंतर भेटला होता. सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील तुफान व्हायरल झाले होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List