‘चूक केली, आता मूव्ह ऑन..’; दलजीत कौरच्या पतीची पोस्ट चर्चेत

‘चूक केली, आता मूव्ह ऑन..’; दलजीत कौरच्या पतीची पोस्ट चर्चेत

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दलजीत कौरच्या वैवाहिक आयुष्यात गेल्या काही महिन्यांपासून समस्या सुरू आहेत. दलजीतने गेल्या वर्षी मार्च महिन्यात केन्यातील बिझनेसमन निखिल पटेलशी तिने दुसरं लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या दहा महिन्यांतच ती पतीला सोडून भारतात परतली. भारतात आल्यानंतर दलजीत आणि निखिलच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं. सुरुवातीला तिने याविषयी मौन बाळगणं पसंत केलं. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती सोशल मीडियावर विविध पोस्ट लिहित पतीवर विवाहबाह्य संबंधाचा आरोप करताना दिसली. इतकंच नव्हे तर निखिलने लग्नाला मान्यता देण्यास नकार दिल्याचंही तिने म्हटलंय. दलजीतच्या या सर्व आरोपांवर निखिलने एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टीकरण दिलं. त्यानंतर आता त्याच्या सोशल मीडियावरील एका पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

निखिलने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. ‘एक पाऊल उचलण्यास घाबरून बसण्यापेक्षा झेप घेणं आणि चूक करणं अधिक चांगलं आहे,’ असं या पोस्टमध्ये लिहिलं आहे. हीच पोस्ट शेअर करत निखिलने त्याच्या चुकांमधून शिकल्याचं म्हटलंय. ‘100 टक्के.. मी अशाच पद्धतीने वागतो. चुका करा, ठीक आहे. त्यातून शिका आणि पुढे चला’, असं निखिलने या पोस्टवर लिहिलं आहे.

निखिल पटेलची पोस्ट-

‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत निखिल म्हणाला होता, “यावर्षी जानेवारी महिन्यात दलजीतने मुलाला घेऊन भारतात जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आम्ही तिथेच विभक्त झालो. आमच्या या मिश्र कुटुंबाचा पाया तितका मजबूत बनू शकला नाही जितकी आम्हाला अपेक्षा होती. दलजीतला केन्यामध्ये राहायला जमत नव्हतं.”

दलजीतसोबतच्या लग्नाबद्दल निखिलने पुढे सांगितलं, “मार्च 2023 मध्ये आम्ही मुंबईत भारतीय विवाहपद्धतीनुसार लग्न केलं. या विवाहाला सांस्कृतिक मान्यता असली तरी ते कायदेशीररित्या बंधनकारक नाही. त्या सोहळ्याचा हेतू हाच होता की दलजीत माझ्यासोबत केन्याला शिफ्ट होणार असल्याचं आश्वासन तिच्या कुटुंबाला मिळावं. आमच्या अनेक प्रयत्नांनंतरही दलजीतसाठी केन्यामध्ये राहणं खूप आव्हानात्मक झालं होतं. तिला भारतातील तिच्या करिअरची आणि आयुष्याची खूप आठवण येत होती. त्यामुळे वैवाहिक आयुष्यातील ही गुंतागुंत वाढतच गेली.”

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;