ऐश्वर्या रायचा अत्यंत जुना व्हिडीओ आला समोर, सौंदर्यावर चाहते फिदा

ऐश्वर्या रायचा अत्यंत जुना व्हिडीओ आला समोर, सौंदर्यावर चाहते फिदा

अभिनेत्री ऐश्वर्या राय हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. ऐश्वर्या गेल्या काही वर्षांपासून दूर आहे. पण तिचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता देखील ऐश्वर्या हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्री काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये प्रचंड सुंदर दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या हिच्या जुन्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्री गाणं गाताना दिसत आहे. जेव्हा ऐश्वर्या राय कोणत्याही कार्यक्रमात किंवा सार्वजनिक ठिकाणी दिसते, तेव्हा अभिनेत्री स्वत: ला अतिशय शांतपणे आणि सुंदरपणे चाहत्यांसमोर सादर करते. पण आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या गाताना आणि डान्स करताना दिसत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Aishwarya🫅🤍 (@aishwaryamylight)

 

ऐश्वर्या हिचा आता व्हायरल होत असलेला व्हिडीओ ‘गुजारिश’ सिनेमाच्या प्रमोशन दरम्यानचा आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री सिनेमातील ‘उडी आंखे’ गाणं गाताना दिसत आहे. तिच्यासोबत बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक संजय लिला भान्साळी देखील दिसत आहेत.

भन्साळी आणि ऐश्वर्या गाणं गात असताना अभिनेता हृतिक रोशन देखील स्टेजवर येतो आणि गाणं गाऊ लागतो. सध्या तेव्हाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ‘गुजारिश’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमा 2010 मध्ये प्रदर्शित झाला होता.

संजय लिला भन्साळी दिग्दर्शित सिनेमात ऐश्वर्या राय आणि हृतिक रोशन यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. हृतिक – ऐश्वर्या यांनी भन्साळी यांच्या ‘जोधा अकबर’, ‘धूम 1’ यांसरख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. तेव्हा सिनेमाची तुफान चर्चा रंगली होती. शिवाय सिनेमात काही गाण्यांना चाहत्यांनी डोक्यावर घेतलं होतं.

ऐश्वर्या हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री आता बॉलिवूडपासून दूर आहे. पण एक काळ असा होता जेव्हा ऐश्वर्या हिच्यासोबत काम करण्यासाठी अभिनेते आणि दिग्दर्शकांची रांग लागली होती. फक्त चाहतेच नाहीतर, अनेक सेलिब्रिटी देखील अभिनेत्रीच्या सौंदर्यावर फिदा होता.

आता देखील वायच्या 50 व्या वर्षी ऐश्वर्या चाहत्यांनी फॅशन गोल्स देत असते. सोशल मीडियावर देखील ऐश्वर्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;