खूप कमी लोकांना माहितीये बॉबी देओलची प्रेम कहाणी, मोठ्या घराण्यातली आहे त्याची पत्नी

खूप कमी लोकांना माहितीये बॉबी देओलची प्रेम कहाणी, मोठ्या घराण्यातली आहे त्याची पत्नी

अभिनेता धर्मेंद्र यांच्या कुटुंबातील दोन्ही सूना म्हणजेच सनी देओल आणि बॉबी देओल यांची पत्नी तसेच त्यांच्या सासू प्रकाश कौर या नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहतात. दोन्ही सून मोठ्या घराण्यातल्या होत्या. बॉबी देओलची पत्नी तान्याने सांगितले होते की, तिच्या सासरच्या लोकांनी तिला खुल्या मनाने स्वीकारले होते. तिचे वहिनी पूजासोबत त्याचे चांगले संबंध आहेत आणि दोघेही एकत्र घरातली कामे करतात.

अबू जानी आणि संदीप खोसला यांना दिलेल्या एका मुलाखतीत तान्या देओलने सांगितले होते की, ती आणि पूजा दोघी घरातील कामाचे वाटप करतात म्हणजे जेणेकरून कोणावरही कामाचा ताण येऊ नये. आम्ही महिन्याला कामाचे वाटप करायचो.

तान्या-बॉबीची प्रेमकहाणी

तान्या ही करोडपती बँकर दिवंगत देवेंद्र आहुजा यांची मुलगी आहे. बॉबी देओल आणि ती एका इटालियन कॅफेमध्ये भेटले होते. ती भाऊ आणि काही मित्रांसोबत तिथे गेली होती. बॉबी देओलने तिला तिथे पहिल्यांदा पाहिले होते. तिला पाहताच तो तिच्या प्रेमात पडला होता. पहिल्या भेटीनंतर दोघेही अनेकदा एकमेकांना भेटत राहिले. त्यानंतर चंकी पांडेच्या घरी एका दिवाळी पार्टीत ते पत्ते खेळत असताना बॉबी देओल तेथे आला आणि तो देखील तिच्यासोबत खेळू लागला. तान्याला तो हरवत राहिला. तो तिला बाहेर जेवायला घेऊन जाईल असं त्याने यावेळी म्हटले होते.

ॲनिमल'मध्ये 3 लग्न करणारा बॉबी देओल पत्नीबद्दल म्हणाला, "गेल्या 28  वर्षांपासून.." - Marathi News | Fan asks Bobby Deol about his multiple  marriages in Animal actor replies about his wife ...

तान्याने पुढे सांगितले की, एकदा बॉबी देओलने तिला रात्री उशिरा फोन केला होता, पण तेव्हा तिने फोन उचलला नाही. आधी बॉबी देओलला वाटले की, तान्या त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. मग दुसऱ्या दिवशी तान्याने कोणाचा फोन होता म्हणून माहिती घेण्यासाठी फोन केला होता. तेव्हा त्याचा हा भ्रम दूर झाला. त्यानंतर बॉबीने तिला पुन्हा फोन केला. दोघेही फोनवर जवळपास सात तास बोलत होते.

बॉबी देओल की शादी को 25 साल पूरे,खूबसूरती में एक्ट्रेस को मात देती हैं वाइफ  तान्या, देखें कपल की रोमांटिक PICS | Bobby deol wedding anniversary actors  share pics with his ...

मग हळूहळू रोज असे फोन सुरु झाले. त्यानंतर बरेच दिवस रिलेशनशिपममध्ये राहिल्यानंतर दोघांनी विवाह केला.

Animal सिनेमामुळे बॉबी देओल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बॉबी देओल त्याआधी आश्रम या वेब सीरिजमुळे चर्चेत होता. सध्या त्याच्याकडे अनेक ऑफर्स येत आहेत. पण त्याने आश्रम या वेब सीरीजकडे पुन्हा लक्ष वळवले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;