मालिकांमधील लोकप्रिय जोड्यांचं केळवण; लग्नापूर्वी प्रेक्षकांकडून खास सल्ला
लग्न म्हटलं की मराठी कुटुंबात खूप प्रेमाने आणि आपुलकीने सगळे विधी पारंपरिक पद्धतींनी पार पाडले जातात. असाच एक विधी म्हणजे केळवण. जो लग्नाच्या आधी नातेवाईक आणि मित्र परिवार नवं दाम्पत्यासाठी करतात.
घरात लग्नकार्य असेल तर हमखास केळवणाची आमंत्रणं येतात. पूर्वी नवरीचं केळवण करण्याची पद्धत होती. पण हल्ली नवरा-नवरी दोघांनाही मित्रमंडळींकडून केळवणाचं आमंत्रण दिलं जातं.
झी मराठी वाहिनीवरील गाजत असलेल्या लाडक्या जोड्या म्हणजेच एजे-लीला, आकाश-वसुंधरा, आशु-शिवा आणि पारू-आदित्य यांचा केळवण सोहळा झी मराठीने प्रेक्षकांसोबत पार पाडला आहे.
या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रणव रावराणे आणि अंकिता मेस्त्री यांनी केलं. आशुला तर चक्क एका काकूंनी शिवाला आपल्या प्रेमाची कबुली कशी दिली पाहिजे हे शिकवलं, तर कोणी लीलाला एजेला हसववण्याचा सल्ला दिला.
आकाशने उखाण्याच्या खेळात बाजी मारली तर उखाण्याच्या खेळात लीलाने, वसुंधरेच्या गुरुची भूमिका पार पाडली. उपस्थित असलेल्या बायकांनी या जोड्यांचं औक्षण केलं. इतकंच नाही तर आशीर्वादसुद्धा वेगळ्या पद्धतींनी दिले गेले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.






Comment List