हॅपी बर्थडे पापा..; रितेश-जिनिलिया यांच्याकडून विलासराव देशमुख यांना अभिवादन
अभिनेता रितेश देशमुखचे दिवंगत वडील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा आज 79 वा जन्मदिन आहे. यानिमित्ताने संपूर्ण देशमुख कुटुंबीय हे बाभळगाव इथल्या विलासबागेत उपस्थित राहिले.
रितेश आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख यांनी सोशल मीडियावर हे फोटो पोस्ट केले आहेत. कुटुंबीय आणि असंख्य चाहत्यांसोबत उपस्थित राहून त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केलं.
रितेशचे भाऊ आणि आमदार धीरज देशमुख यांनीसुद्धा सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. धीरज यांच्या पत्नी दीपशिखा देशमुख, अमित देशमुख आणि इतरसुद्धा या फोटोंमध्ये दिसत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List