‘निर्लज्जपणे तिच्यासोबत तू दररोज..’; दलजीतकडून दुसऱ्या पतीवर विवाहबाह्य संबंधाचे आरोप

‘निर्लज्जपणे तिच्यासोबत तू दररोज..’; दलजीतकडून दुसऱ्या पतीवर विवाहबाह्य संबंधाचे आरोप

‘इस प्यार को क्या नाम दूँ’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दलजीत कौरने मार्च 2023 मध्ये निखिल पटेलशी दुसरं लग्न केलं. या लग्नानंतर ती निखिल आणि मुलासोबत केन्याला राहायला गेली. मात्र वर्षभरातच ती पतीला सोडून मुलासोबत भारतात परतल्यानंतर दलजीतच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं. दलजीतने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पतीसोबतचे सर्व फोटो आणि व्हिडीओसुद्धा डिलीट केले होते. त्यावर आतापर्यंत तिने मौन बाळगलं होतं. अखेर सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये दलजीतने पती निखिलवर विवाहबाह्य संबंधाचा गंभीर आरोप केला आहे. शनिवारी दलजीतने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये निखिलचा जिममधील फोटो शेअर केला. त्यावरील ‘SN’ या अक्षरांवर तिने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं.

‘तू आता दररोज निर्लज्जपणे तिच्यासोबत सोशल मीडियावर पोस्ट करतोय. लग्नाच्या दहा महिन्यांतच तुझी पत्नी आणि मुलगा भारतात परतले. संपूर्ण कुटुंबीयांचा अपमान झाला. किमान मुलांखातर तरी थोडा आदर बाळगायला पाहिजे होता. किमान सार्वजनिकरित्या तुझ्या पत्नीसाठी तरी थोडा सन्मान बाकी ठेवायला पाहिजे होता. कारण मी इतर बऱ्याच गोष्टींबद्दल मौन बाळगून होते’, असं तिने निखिलच्या फोटोवर लिहिलं आहे. निखिलचा फोटो पोस्ट करत थेट त्याच्यावर निशाणा साधण्यासाठी दलजीतने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये आणखी एक पोस्ट लिहिली होती. ब्रायडल फोटोशूटमधील स्वत:चा फोटो पोस्ट करत तिने नेटकऱ्यांना प्रश्न विचारला होता. ‘विवाहबाह्य संबंधाविषयी तुमचे काय विचार आहेत? कोणाला दोष दिला पाहिजे? मुलगी, पती की पत्नी?’, असं तिने लिहिलं होतं.

दलजीतची पोस्ट-

शुक्रवारी दलजीतने तिच्या ब्रायडल फोटोशूटचा रिल पोस्ट केला होता. या रिलच्या कॅप्शनमध्येही तिनेही भावना व्यक्त केल्या होत्या. ‘मुलांखातर ती गप्प राहण्याचं ठरवते. ती खचून जाऊ नये म्हणून तिचं कुटुंब तिच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहतं. ती वाट पाहते.. हाय SN तुला पण मुलं आहेत का?’, असं तिने लिहिलं होतं. दलजीतने 10 मार्च 2023 रोजी बिझनेसमन निखिल पटेलशी दुसरं लग्न केलं. हे दोघांचंही दुसरं लग्न होतं. याआधी दलजीतने अभिनेता शालीन भनोतशी पहिलं लग्न केलं होतं. शालीन आणि दलजीत यांना एक मुलगा आहे. तर निखिललाही पहिल्या पत्नीपासून दोन मुली आहेत. दलजीतने शालीन भनोतवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करत घटस्फोट दिला होता. 2015 मध्ये हे दोघं विभक्त झाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;