Cannes 2024 : डीपनेक ब्लू ड्रेसमध्ये अवनीत कौरचा डेब्यू; पाहा फोटो
टीव्ही सिरीयल पासून ते सिल्वर स्क्रीनपर्यंतच्या प्रवासात वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री अवनीत कौर सध्या प्रचंड चर्चेत आहे. वयाच्य़ा 22 व्या वर्षातच अवनीतने इंडस्ट्रीमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दरम्यान यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्ये अवनीतने चित्रपटाचे पोस्टर लाँच करणारी सर्वात तरुण भारतीय अभिनेत्री बनून इतिहास रचला. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिने तिच्या आगामी इंडो-व्हिएतनामी चित्रपट “लव्ह इन व्हिएतनाम” चे पोस्टर लाँच केले.कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अवनीतने रॉयल ब्लू ड्रेस परिधान केला होता. या सोबतच अवनितने डोळ्यांच्या मेकअपसह न्यूड टोन मेक-अप केला होता. त्यामुळे ती तिच्या निळा रंगाच्या ड्रेसवर सुंदर दिसत होती. अवनीतने तिच्या केसांचा साधा बन बनवला होता. अवनितला या निळ्या ड्रेसमध्ये बघून चाहते घायाळ झाले आहेत. अवनितचे हे फोटो व्हायरल झाले असून चाहत्यांच्या नजरा तिच्यावरचं खिळल्या आहेत.

About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List