Pune hit and run: लोकसभा निकालानंतर धक्कादायक खुलासे करणार – सुषमा अंधारे
पुण्यात कल्याणीनगरमध्ये वेदांत अग्रवालने दिलेल्या धडकेत दोघांचा चिरडून मृत्यू झाला. या संतापजनक घटनेवरून राज्यभरात संतापाचे वातावरण पसरले आहे. अशातच पोलिसांच्या ताब्यात असलेल्या डॉ.अजय तावरेंनी मी सगळ्यांची नावे जाहीर करेन असे म्हंटले होते. त्यावर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पोर्शे कार प्रकरण आणि आरोग्य खात्यातला सावळा गोंधळ या संबंधीचे काही धक्कादायक खुलासे लोकसभा निकालानंतर करेन असे ट्विट केले आणि पत्रकार परिषदेत देखील त्याची माहिती दिली. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
4 जूनला निकाल आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी आणि पोलिसांवरचा ताण कमी व्हावा म्हणून पोर्शे कार प्रकरण आणि आरोग्य खात्यातला सावळा गोंधळ या संबंधीचे काही धक्कादायक खुलासे निकालानंतर करेन.
पण तोवर डॉ अजय तावरे च्या जीविताच्या सुरक्षिततेची काळजी नक्कीच वाटते. @PTI_News @ANI— SushmaTai Andhare
(@andharesushama) May 29, 2024
पोर्शे कार अपघात प्रकरणी सुषमा अंधारे यांनी सोशल मीडिया साईट एक्सवर केलेल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, ”4 जूनला निकाल आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी आणि पोलिसांवरचा ताण कमी व्हावा म्हणून पोर्शे कार प्रकरण आणि आरोग्य खात्यातला सावळा गोंधळ या संबंधीचे काही धक्कादायक खुलासे निकालानंतर करेन. पण तोवर डॉ अजय तावरे च्या जीविताच्या सुरक्षिततेची काळजी नक्कीच वाटते”. असे ट्विट केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
(@andharesushama)
Comment List