‘लापता लेडीज’मधील जया-दीपक खऱ्या आयुष्यात एकमेकांना करतायत डेट?
किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' या चित्रपटाचं प्रेक्षक-समिक्षकांकडून प्रचंड कौतुक झालं. या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली. या चित्रपटात 'जया' आणि 'दीपक'ची भूमिका साकारणारे कलाकार प्रतिभा रांटा आणि स्पर्श श्रीवास्तव हे एकमेकांना डेट करत असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे.
प्रतिभा आणि स्पर्श यांच्या ऑफस्क्रीन केमिस्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधलंय. हे दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जातंय. त्यावर आता दोघांनी प्रतिक्रिया दिली आहे. नुकतंच या दोघांना 'नेटफ्लिक्स इंडिया'च्या ऑफिसमध्ये पाहिलं गेलं. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांची उत्तरं दिली.
तुम्ही एकमेकांना डेट करताय का, असा प्रश्न विचारला असता प्रतिभा म्हणाली, "आम्ही डेट करतोय का? नाही.. अजिबात नाही." यानंतर स्पर्श म्हणतो, "यार.. एक मुलगा आणि मुलगी फक्त मित्रसुद्धा असू शकतात." यानंतर दोघं त्यांच्या हाताने हृदयाचा आकार बनवण्याचा प्रयत्न करतात, मात्र ते त्यांना जमत नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.





Comment List