व्ही. के. पांडियन यांची सक्रिय राजकारणातून निवृत्ती, लोकसभा निवडणुकीत BJD च्या खराब कामगिरीनंतर निर्णय
दिल्लीत एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आलेली असताना ओडिशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे जवळचे समजले जाणारे नेते व्ही. के. पांडियन यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बिजू जनता दल पक्षाची कामगिरी सुमार राहिली. BJD ला एकही जागा जिंकता आली नाही. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत व्ही. के. पांडियन यांनी सक्रिय राजकारणाला रामराम ठोकला.
ओडिशामध्ये लोकसभेच्या 21 जागा आहेत. यापैकी 20 जागांवर भाजपने विजय मिळवला, तर 1 जागा काँग्रेसने जिंकली. BJD ला भोपळाही फोडता आला नाही. गेल्या (2019) लोकसभा निवडणुकीत BJD ने 12 जागा जिंकल्या होत्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List