राजन पाटलांना वैतागून मोहोळकरांचे महाविकास आघाडीला भरघोस मतदान; भाजपचे संतोष पाटील यांचा घरचा आहेर

राजन पाटलांना वैतागून मोहोळकरांचे महाविकास आघाडीला भरघोस मतदान; भाजपचे संतोष पाटील यांचा घरचा आहेर

सोलापूर लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून काही तास उलटत नाही तोच मोहोळ तालुक्यात महायुतीच्या नेत्यांमधील दुफळी उफाळून आली आहे. माजी आमदार राजन पाटील यांच्या एकाधिकारशाहीला वैतागलेल्या मोहोळकरांनी मतांचे दान महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या पारडय़ात टाकल्याचा दावा करीत भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य संतोष पाटील यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. स्वयंघोषित ‘पर्मनंट आमदार’ म्हणून मिरविणाऱ्या राजन पाटील यांच्या राजकारणाची वाटचाल आता जनरोषामुळे अस्ताकडे सुरू झाल्याचेही संतोष पाटील यांनी सांगितले.

संतोष पाटील म्हणाले, राजन पाटील हे शब्दांचे पक्के आहेत. ते एकदा शब्द दिला की तो पाळतात, यावर जिह्यातील सर्वांचाच विश्वास आहे. त्यामुळेच राजन पाटील यांच्यासारख्या नेत्याला दुखावू नका, अशा सूचना आमच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्या होत्या. त्यामुळे तालुक्यातील सर्वच नेत्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार केला. राजन पाटील आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी महायुतीच्या उमेदवाराचा प्रामाणिकपणे प्रचार केला. प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांना कामाला लावले. गावोगावी जाऊन प्रचार केला. मात्र, त्यांच्या या प्रचाराला कार्यकर्ते आणि मतदारांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. गेल्या तीस वर्षांपासून तालुक्याच्या राजकारणात असणारी राजन पाटील यांची एकाधिकारशाही, तालुक्यासह मतदारसंघातील इतर गावांना दुय्यम समजून आपल्याच अनगर भागाला निधी मिळवून घेणे, आम्ही सांगेल तोच उमेदवार, आम्ही सांगू तीच कार्यपद्धती, कुरघोडय़ाचे राजकारण या अतिआत्मविश्वासाला मोहोळ मतदारसंघातील जनता कंटाळली होती. राजन पाटील यांच्या या कार्यप्रणालीबद्दलचा रोष मतदारसंघातील प्रत्येक गावातील मतदारांमध्ये झिरपला होता. मोहोळ तालुक्यात प्रचारादरम्यान उमेदवार राम सातपुते यांनी भाजपच्या आणि महायुतीच्या घटकपक्षांतील नेत्यांना भेटायचे किंवा संपर्कसुद्धा साधायचा नाही, अशी ताकीद राजन पाटील यांनी दिली होती, असेही संतोष पाटील म्हणाले.

भाजप नेत्यांनी नको तितका विश्वास ठेवला
मोहोळ विधानसभा मतदारसंघात जर महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाले तर त्याचे सारे श्रेय राजन पाटील यांनाच द्या आणि मताधिक्य नाही मिळाले तर त्याची जबाबदारीही राजन पाटील यांनीच स्वीकारावी आणि त्यांनी सरकारच्या माध्यमातून घेतलेले लाभही परत घ्यावेत, असे आम्ही आमच्या नेत्यांना सांगितले होते. मात्र, भाजपच्या नेत्यांनीही राजन पाटील यांच्यावर नको तितका विश्वास ठेवला. राजन पाटील यांच्यावरचा राग मतदारांनी भाजपच्या उमेदवारावर काढला. त्यामुळेच मोहोळ विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना तब्बल 64 हजार मतांचे मताधिक्य मिळाल्याचा आरोप संतोष पाटील यांनी केला आहे. या निवडणुकीमुळे राजन पाटील यांच्या राजकीय अस्ताला सुरुवात झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;