‘शिवा’ मालिकेत मोठा ट्विस्ट; अखेर शिवासोबत बांधली जाणार आशुची लग्नगाठ
झी मराठी वाहिनीवरील 'शिवा' या मालिकेत सध्या 'लग्नसराई विशेष' भाग सुरू आहे. दिव्याशी जन्मोजन्माच्या नात्यात स्वतःला बांधून घेण्यासाठी आशु बाशिंग बांधून मांडवात तयार आहे.
दुसरीकडे शिवा तिच्या मित्राच्या आणि बहिणीच्या लग्नात फक्त एक सावली बनून भाग घेत आहे. एक अशी सावली जी आशुचं लग्नकार्य निर्विघ्न पार पडेल यासाठी पूर्ण तयारी करत आहे. पण नशिबाशी आजपर्यंत कोणीही लढू शकलं नाही.
लग्नाचा मांडव सजला आहे, नवरदेव मांडवात नवरीची वाट पाहत आहे, पण नवरी मांडवातून गायब आहे. ऐनवेळी दिव्या चंदनसोबत पळून जाण्याचा निर्णय घेते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.





Comment List