सर्वोच्च न्यायालयात लोकन्यायालय सप्ताहाचे आयोजन; नगर जिल्ह्यातील प्रकरणांचा समावेश
सर्वोच्च न्यायालयामध्ये लोकन्यायालय सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. नगर जिल्ह्यातील काही प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यापैकी काही प्रकरणे लोकन्यायालयामध्ये निकाली काढण्यासाठी योग्य आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ही प्रकरणे शोधून काढली आहेत. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत या प्रकरणातील सर्व पक्षकरांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पक्षकारांनी विशेष सप्ताहामध्ये प्रकरणात संमती फॉर्म भरून द्यावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा यांनी केले आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने 29 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान सर्वोच्च न्यायालयात लोकन्यायालय सप्ताहाचे आयोजन केले आहे. नगर जिल्ह्यातील काही प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यापैकी काही लोकन्यायालयामध्ये निकाली काढण्यासाठी योग्य आहेत. सर्वोच्च न्यायालयाने अशी प्रकरणे शोधून काढली आणि त्यांची यादी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नगर (DLSA) यांना दिली. या प्रकरणांची यादी http://http:ahmnagar.dcourts.gov.in या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आलेली आहे.
लोकन्यायालयामध्ये या प्रकरणांचा निपटारा सुलभ करण्यासाठी विशेष लोकन्यायालय 2024 आयोजित केली आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने या प्रकरणांमध्ये सर्व पक्षकारांना नोटीस जारी केल्या आहेत. तालुका विधी सेवा प्राधिकरणाला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. कोणत्याही पक्षकराचा पत्ता, दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात असल्यास, ती नोटीस संबंधित जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत किंवा राज्य विधी सेवा प्राधिकरणामार्फत पाठविली जाणार आहे. त्या नोटिसा न्यायालयीन बेलिफामार्फत पाठविल्या जाणार आहेत. नोटिसा मिळाल्यानंतर, त्या सूचीबद्ध प्रकरणांमधील संबंधित पक्षकारांनी विशेष लोकअदालतीमध्ये तडजोडीने प्रकरण मिटविण्यासाठी संमती फॉर्म भरू शकतात. पक्षकार किंवा त्यांच्या वकिलांनी त्यांचे संमती फॉर्म त्यांच्या संपर्क क्रमांक आणि ई-मेल पत्त्यांसह जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला ईमेलद्वारे किंवा प्रत्यक्षरित्या सादर केले पाहिजेत. विशेष लोकन्यायालयापूर्वी त्यांच्या तडजोडीच्या चर्चेची तारीख पक्षकार आणि वकिलांना दिली जाईल. ते त्या बैठकीला प्रत्यक्षपणे किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या लिंकवर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहू शकतात. त्यामुळे याचिकाकर्त्यांचा वेळ आणि पैशांचा अपव्यवय टाळता येणार आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली आणि विशेष लोकन्यायालयाद्वारे निकाली काढण्यासाठी योग्य म्हणून ओळखल्या गेलेल्या जिल्ह्यातील सर्व प्रकरणे या विशेष लोकन्यायालयामध्ये घेण्यात येणार आहेत. अशा सर्व पक्षकारांना आणि त्यांच्या वकिलांना विनंती आहे की, त्यांनी त्या याद्या नगर जिल्हा न्यायालयाच्या संकेतस्थळावर http:ahmnagar.dcourts.gov.in उपलब्ध आहेत. कोणत्याही सहाय्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी मोबाईल नंबर 8591903616 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सदस्य सचिव न्या. भाग्यश्री पाटील यांनी केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List