रामोजी ग्रुपचे अध्यक्ष रामोजी राव यांचे निधन; शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

रामोजी ग्रुपचे अध्यक्ष रामोजी राव यांचे निधन; शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

जगातील सर्वात मोठा फिल्म स्टुडिओ कॉम्प्लेक्स म्हणून ओळख असलेल्या ‘रामोजी फिल्म सिटी’चे अध्यक्ष रामोजी राव यांचे शनिवार, 8 रोजी निधन झाले. हैदराबाद येथे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रामोजी राव यांचे पार्थिव रामोजी फिल्मसिटी येथील निवासस्थानी ठेवल्यानंतर कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांनी अखेरची श्रद्धांजली वाहिली. यावेळी तेलंगणा सरकारने रामोजी राव यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याची घोषणा केली आहे.

माध्यम आणि चित्रपट क्षेत्रांसह अनेक क्षेत्रांत रामोजी राव यांचा दबदबा होता. हैदराबादपासून जवळच असलेल्या नलगोंडा रस्त्यावर अब्दुल्लापूरमेट येथे 1962 मध्ये रामोजी ग्रुपची स्थापना केली होती. यामध्ये रामोजी फिल्म सिटी, उषा किरण मूव्हीज, मयूरी फिल्म डिस्ट्रिब्युटर्स, मार्गदर्शी चिट फंड आणि डॉल्फिन ग्रुप ऑफ हॉटेल्स यासारख्या संस्था निर्माण केल्या. रामोजी यांनी दूरचित्रवाणी वाहिन्यांचे ईटीव्ही नेटवर्क आणि तेलुगू वृत्तपत्र ईनाडूचे प्रमुखदेखील होते. रामोजी यांना पत्रकारिता, साहित्य आणि शिक्षणातील योगदानाबद्दल 2016 मध्ये देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले.

काही दिवसांपूर्वी कर्करोगाचे निदान
रामोजी राव यांचे पूर्ण नाव चेरुकुरी रामोजी राव होते. त्यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1936 रोजी आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील पेडापरपुडी गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. रामोजी यांना काही दिवसांपूर्वी कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. रामोजी यांच्या पश्चात पत्नी रमा देवी आणि मुलगा किरण असा परिवार आहे. रामोजी यांचा धाकटा मुलगा चेरुकुरी सुमन याचे 7 सप्टेंबर 2012 रोजी कर्करोगाने निधन झाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;