सावधान..! पुण्यावर ढग जमले; फ्लॅशफ्लडसारख्या परिस्थितीचा अंदाज; ‘सतर्क’ चा इशारा

सावधान..! पुण्यावर ढग जमले; फ्लॅशफ्लडसारख्या परिस्थितीचा अंदाज; ‘सतर्क’ चा इशारा

राज्यातील वातावरणात बदल झाले आहेत. मॉन्सूनचे राज्यात आगमन झाले असून पावसाने कोकण आणि पुण्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. आता पावसासाठी राज्यात पोषक वातावरण असल्याने मॉन्सूनची आगेकूच वेगात सुरू आहे. नागरिक मान्सूनची आतुरतेने वाट पाहत होते. त्याचे दमदार आगमन होताच नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. तसेच सतर्कने पुण्यामध्ये सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

पुण्यात पहिल्याच पावसाने धुतले, रस्त्यावर पाणीच-पाणी
पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून पुण्यातील विविध परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. पहिल्याच पावसात पुणेकरांचे मेगा हाल झाले आहेत. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.

अनेकांनी पावसापासून बचाव करण्यासाठी आडोसा घेतला होता. 11 जूनपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपूर्वीही पुण्यात ढगफुटीसदृष्य पाऊस झाला होता. शहरातील धानोरी, कात्रज, विमान नगर परिसरात पावसामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झाले होते. त्यातच आता पुण्यासाठी सर्तकने इशारा दिला आहे. पुण्यावर उंच ढगांची निर्मिती सुरू असून, कमी वेळात जास्त पाऊस झाल्याने काही ठिकाणी फ्लॅशफ्लड सारखी स्थिती, तसेच झाडे पडणे, भिंती पडणे, घरांमध्ये पाणी शिरणे आदी घटना शक्य. पाणी ओसरेपर्यंत घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कमी वेळात जास्त पाऊस सुरू असताना वरंध घाटातून प्रवास टाळावा. घाट रस्त्यावर डोंगरावरून दगड निसटून येण्याची शक्यता आहे, असेही सतर्कने म्हटले आहे.

हवामान खात्याने कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. संततधारेसह काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, गोवा येथे विजांसह पावसाची शक्यता आहे. तर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, नगर, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी, बीड येथेही पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघरमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;