पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणुक करणार्या सराईत गुन्हेगारांच्या अवघ्या 24 तासात मुसक्या आवळल्या
जालन्यात पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणुक करणार्या इराणी गँग (इराणी टोळी)चे सराईत दोन गुन्हेगारांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 24 तासात मुसक्या आवळल्या असून आरोपींच्या ताब्यातून तब्बल 2 लाख 72 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान सराईत गुन्हेगारांवर हैद्राबाद व छिंदवाडा राज्यातही गुन्हे दाखल आहेत.
जालना शहरातील नवीन मोंढा ते वरकड हॉस्पीटलकडे जाणार्या रोडवर दोन अनोळखी आरोपींनी दिलीपराव दत्तु क्षिरसागर रा. कडवंची, ता.जि.जालना यांना 6 जुन रोजी 3 वाजेच्या सुमारास पोलीस असल्याची बतावणी करुन त्यांच्याकडील दीड तोळयाची सोन्याची चैन व दोन तोळयाच्या दोन सोन्याच्या अंगठया हातचलाखी करुन काढुन घेतल्या. त्यामुळे शेतकरी दिलीपराव क्षिरसागर यांच्या फिर्यादीवरुन सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल व अपर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी यांनी स्थानिक गुन्हे शाखेस गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष तपास पथक तयार करुन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या होत्या.
त्याअनुषंगाने 7 जुन रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने तांत्रिक विश्लेषण, माहितगार यांचे कडुन माहिती संकलित करुन गुन्हा हा अत्यंत शिताफिने उघड करुन गुन्ह्यातील सराईत आरोपी तन्वीर हुसैन अजीज अली रा. हुसैन कॉलनी, चिद्री रोड, बीदर, जि. बीदर, राज्य कर्नाटक, जाफर हबीब वेग (रा. शिवाजीनगर), परळी, ता. परळी, जि.बीड यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याचे अनुशंगाने विचारपुस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली व गुन्हयामध्ये हातचलाखी करुन फसवणुक केलेला 1 लाख 62 हजार किंमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या व एक सोन्याची चैन असा मुद्देमाल , गुन्हा करतांना वापरलेला टीव्हीएस अपाचे मोटार सायकल व आरोपीतांचे मोबाईल असा एकुण 2 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल आरोपींनी काढुन दिल्याने तो गुन्हयाचे तपासकामी जप्त केला आहे. दरम्यान सदर आरोपी हे ईराणी गँग (इराणी टोळी) चे आहेत. आरोपींवर यापूर्वी हैद्राबाद व छिंदवाडा येथे गुन्हे दाखल आहेत.
गुन्ह्यातील आरोपींनी गुन्हा करतांना वापरलेल्या मोटार सायकलबाबत अधिक माहिती मिळविली असता सदर मोटार सायकल ही पुणे येथुन चोरी केलेली असल्याचे आढळुन आले असुन त्यावर पोलीस ठाणे कोंडवा, पुणे येथे गुन्हा दाखल आहे. तसेच आरोपीतांनी आणखी अशाच प्रकारचे चंदनझिरा व भोकरदन हद्दीमध्ये गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल व अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पोलीस उप निरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे, कृष्णा तंगे, सागर बाविस्कर, रामप्रसाद पव्हरे, सचिन चौधरी सर्व स्थागुशा, जालना यांनी केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List