श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा अनुदानात गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल; 16 जणांवर आरोप

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा अनुदानात गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल; 16 जणांवर आरोप

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत 1 कोटी 88 लाख 47 हजार 524 रुपये इतक्या रकमेच्या कांदा अनुदानाचा बोगस प्रस्ताव तयार करुन आणि त्यासंबंधित निधीचा गैरव्यवहार करुन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी समितीचे सचिव दिलिप डेबरे यांच्यासह आडते व व्यापारी अशा 16 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

1 मे 2023 ते 1 जुलै दरम्यान या घटना घडल्या. आरोपींमध्ये सचिव दिलीप लक्ष्मण डेबरे (रा. वेळू, ता. श्रीगोंदा), आडते/व्यापारी हवालदार ट्रेडिंग कंपनी आणि त्यांचे दिवाणजी, महादेव लोखंडे (रा. चिंभळे, ता. श्रीगोंदा), सत्यम ट्रेडर्स, राज ट्रेडर्स, घनश्याम प्रकाश चव्हाण (रा. श्रीगोंदा) यांचा समावेश आहे. श्रीगोंदा), शरद झुंबर होले (रा. होलेवस्ती, श्रीगोंदा), संदीप श्रीरंग शिंदे (रा. आढाळगाव), राजू भानुदास सातव (रा. श्रीगोंदा), सोपान नारायण सिदनकर (रा. श्रीगोंदा), दत्तात्रेय किसन राऊत (रा. शेडगाव), सिदनकर झुंबर किसन (रा.श्रीगोंदा), शेंडगे संतोष दिलीप (रा.श्रीगोंदा), भाऊ मारुती कोथिंबिरे (रा.साळवण देवी रोड), महेश सुरेश मडके (रा. लोणीव्यंकनाथ, मडकेवाडी) आणि परशुराम गोविंद सोनवणे (रा. टाकळी) यांचा समावेश आहे. कडेवली) आहे.

तक्रारदार राजेंद्र फकिरा निकम, जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग 1 सहकारी संस्था, नगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपींवर भारतीय दंड विधान कलम 420 (फसवणूक), 465 आरोपींवर भारतीय दंड विधान कलम 420 (फसवणूक), 465 (कागदपत्रांची बनावट), 468 (फसवणूक करण्याच्या उद्देशाने कागदपत्रांची बनावट), 471 (बनावट कागदपत्रांचा वापर), 477 (अ) (लेखापरीक्षणाची फसवणूक) आणि 34 (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक ज्ञनेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ मुकेशकुमार बडे यांनी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि प्रभाकर निकम करीत आहेत.

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सचिव दिलीप डेबरे यांच्यासह व्यापारी, आडते यांच्यासह 16 जणांवर गुन्हा दाखल झाला असून या गुन्ह्याची व्याप्ती फार मोठी असून या मध्ये कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी यांची कसून चौकशी करून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नावावर अनुदान काढून शासनाची तसेच शेतकरी यांची फसवणूक करणाऱ्या सर्वांवर कडक कायदेशीर कारवाई करणार.
– ज्ञानेश्वर भोसले, पोलीस निरीक्षक, श्रीगोंदा

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;