रॉयल आयुष्य जगते ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री; 50 सेकंदांसाठी घेते कोट्यवधी रुपये

रॉयल आयुष्य जगते ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री; 50 सेकंदांसाठी घेते कोट्यवधी रुपये

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांच्या नावावर सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करतो. त्या अभिनेत्री देखील गेल्या अनेक वर्षांपासून झगमगत्या विश्वावर राज्य करत आहेत. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री नयनतारा… नयनतारा झगमगत्या विश्वातील सर्वत्र श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी. अभिनेत्रीची फक्त भारतात नाहीतर, परदेशात देखील गडगंज संपत्ती आहे. नयनतारा कायम तिच्या रॉयल आयुष्यामुळे चर्चेत असते. 50 सेकंदांसाठी अभिनेत्री कोट्यवधींचं मानधन घेते.

‘जवान’ सिनेमात अभिनेत्रीने किंग खानसोबत झळकलेली नयनतारा हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. रिपोर्टनुसार, नयनतारा हिने टाटा स्कायच्या 50 सेकंदांच्या एका जाहिरातीसाठी 5 कोटी रुपये घेतले होते. जाहिरातीचं शुटिंग दोन दिवसांमध्ये पूर्ण झालं होतं. चार भाषांमध्ये जाहिरात शूट करण्यात आली. जाहिरातींप्रमाणे अभिनेत्री एका सिनेमासाठी 10 कोटी रुपये मानधन घेते.

नयतारा कायम तिच्या संपत्तीमुळे आणि खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. फक्त भारतात नाहीतर, परदेशात देखील संपत्ती आहे. रिपोर्टनुसार, अभिनेत्रीच्या चेन्नईतील घराची किंमत 1000 कोटी रुपये आहे. केरळ आणि मुंबई याठिकाणी देखील नयनतारा हिचं आलिशान घर आहेत. नयनतारा हिचं हैदराबाद याठिकाणी 15 कोटी रुपयांचं घर आहे. चेन्नईमध्ये अभिनेत्रीचं 4 बीएचके घर आहे.

नयनतारा हिचं कार कलेक्शन

नयनतारा हिच्याकडे स्वतःचं प्रायव्हेट जेट आहे. नयनतारा हिचं कार कलेक्शन देखील भन्नाट आहे. अभिनेत्रीकडे बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज कार आहे, जिची किंमत 88 लाख रुपये आहे. शिवाय नयनतारा हिच्याकडे टोयोटा इनोव्हा क्रिस्टा, फोर्ड आणि बीएमडब्ल्यू 7 सीरिज देखील आहे.

नयनतारा हिचं खासगी आयुष्य

अभिनेत्री नयनतारा हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री 9 जून 2022 मध्ये चित्रपट निर्माता विघ्नेश शिवन याच्यासोबत लग्न केलं. लग्नाच्या चार महिन्यांनंतर म्हणजेच ऑक्टोबरमध्ये नयनतारा सरोगसीद्वारे जुळ्या मुलांची आई झाली. अभिनेत्री आता मुलांसोबत फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

नयनतारा कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;