वर्षभरात मध्यावधी निवडणुका लागणार; फडणवीस, योगींचा उल्लेख करत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचे भाकित

वर्षभरात मध्यावधी निवडणुका लागणार; फडणवीस, योगींचा उल्लेख करत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचे भाकित

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले नाही. त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाचा टेकू घ्यावा लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी संसदेतच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या घटक पक्षांची बैठक झाली आणि एकमताने नरेंद्र मोदी यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. मात्र पलटी मारण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यामुळे हे सरकार कितपत चालेल हा प्रश्नच आहे. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी मोठे भाकित केले आहे. आगामी सहा महिने ते वर्षभराच्या काळात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता असल्याचे बघेल म्हणाले आहेत.

भुपेश बघेल यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर आपली भूमिका मांडली आहे. यात त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना तयार राहण्याचे आवाहन केले आहे. सहा महिने ते वर्षभरात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवी राजीनामा देण्याच्या तयारीत असून योगी आदित्यनाथ यांची खुर्चीही हलू लागली आहे. भजनलाल शर्माही डगमगायला लागले आहेत, असे बघेल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

एनडीएमधील घटकपक्ष जदयूबाबत बोलताना बघेल म्हणाले की, सरकार अजून स्थापन झालेले नाही, तो जदयूचे प्रवक्ते अग्निवीर योजना रद्द करण्याची मागणी करत आहेत. यासह जातीनिहाय जनगणनेसाठी दबाव टाकत आहेत. समान नागरी संहितेचीही गरज नसल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहे. हे सर्व मुद्दे राहुल गांधी यांनीही उपस्थित केले होते.

संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना लोकांनी झिडकारलं; संजय राऊत यांचा घणाघात

एनडीएचे सरकार स्थापन होईल, पण नंतर त्यांच्यातच खटके उडण्यास सुरुवात होईल. खटके उडायला लागले की सरकारचा पाया ठिसूळ व्हायला जास्त वेळ लागणार नाही. सरकार बनले पण नेहमी भांडणं होत राहतील, असेही बघेल म्हणाले.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीमध्ये भुपेश बघेल हे देखील रिंगणात उतरले होते. राजनंदगाव मतदारसंघातून ते निवडणूक लढले. मात्र भाजपच्या संतोष पांडे यांनी त्यांचा 44 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. छत्तीसगडमध्ये भाजपने 11 पैकी 10 जागा जिंकल्या. काँग्रेसला कोरबा या एकमेव जागेवर विजय मिळाला.

आघाडी सरकार चालवायला मोठे मन, सर्वसमावेशक दृष्टिकोन लागतो, गोगोई म्हणाले, पंतप्रधान म्हणून मोदींचे भविष्य अनिश्चित

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;