मद्यधुंद अवस्थेत वृद्ध महिलेला मारहाण केल्याच्या आरोपांवर अखेर रवीनाने सोडलं मौन

मद्यधुंद अवस्थेत वृद्ध महिलेला मारहाण केल्याच्या आरोपांवर अखेर रवीनाने सोडलं मौन

मद्यधुंद अवस्थेत वृद्ध महिलेला मारहाण केल्याच्या आरोपांवर अखेर रवीनाने सोडलं मौन

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रवीना टंडनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. यामध्ये ती लोकांना विनंती करताना दिसत होती. रवीनावर एका वृद्ध महिलेला मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. वांद्रे इथं कार्टर रोड परिसरात ही घटना घडली होती. रवीनाच्या कारने एका वृद्ध महिलेला धडक दिली आणि त्यानंतर ती मद्यधुंद अवस्थेत कारबाहेर येऊन लोकांशी वाद घालत होती, असे आरोप तिच्यावर करण्यात आले होते. याप्रकरणी दोन्ही पक्ष पोलिसांसमोर हजर झाले, मात्र कोणाकडूनही तक्रार दाखल झाली होती. अखेर या घटनेच्या काही दिवसांनंतर रवीनाने प्रतिक्रिया दिली आहे. या संपूर्ण घटनेदरम्यान ज्या लोकांनी तिच्यावर विश्वास ठेवला आणि ज्यांनी तिची साथ दिली, त्यांचे तिने आभार मानले. त्याचप्रमाणे या सर्व गोष्टीचं तात्पर्य काय, असा सवाल करत तिने डॅशकॅम्स आणि सीसीटीव्ही पाहण्यास सांगितलंय.

रवीनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ही पोस्ट लिहिली आहे. ‘माझ्यावरील प्रेम, विश्वासाबद्दल खूप खूप धन्यवाद. मला साथ दिली यासाठी मी आभार मानते. या कथेचं तात्पर्य काय? आताच्या आता डॅशकॅम्स आणि सीसीटीव्ही आणा’, असं तिने या पोस्टमध्ये म्हटलंय. कार उभी करण्यावरून झालेल्या वादातून रवीना आणि तिच्या चालकाने मारहाण केल्याचा आरोप तिघांनी केला होता. शनिवारी रात्री वांद्रे इथल्या कार्टर रोडवर ही घटना घडली होती. स्थानिकांनी रवीनाच्या कारला घेराव घातल्यानंतर तिने बाहेर येऊन जमावाशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. “कृपया मला मारू नका, माझ्या ड्राइव्हरला मारू नका”, अशी ती विनंती करताना या व्हिडीओत दिसून आली होती.

नेमकं काय घडलं होतं?

कार्टर रोड परिसरात रवीनाचा ड्राइव्हर कारची पार्किंग करताना मागे एक वृद्ध महिला उभी होती. कार फिरवताना वृद्ध महिलेला धडक लागल्याचा आरोप तिच्यासोबत असलेल्या व्यक्तीने केला. यानंतर तिथे काही स्थानिक लोक जमले आणि त्यांनी रवीनाच्या ड्राइव्हरला कारबाहेर काढून मारण्यास सुरुवात केली. तेव्हा रवीना मध्यस्थी करण्यासाठी आली आणि तिने लोकांना विनंती केली. “कृपया माझ्या ड्राइव्हरला मारू नका, हात उचलू नका”, अशी विनंती रवीनाने केली. रवीनाच्या मते तिच्या कारची धडक वृद्ध महिलेला लागलीच नव्हती. तरीही स्थानिकांनी वाद वाढवला. तर दुसरीकडे संबंधित वृद्ध महिलेसोबत असलेल्या व्यक्तीने रवीनासह तिच्या चालकावर मारहाण आणि शिवीगाळचा आरोप केला.

खार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्हीत असं दिसून आलं की संबंधित वृद्ध महिला ही रवीनाच्या कारजवळच उभी होती, मात्र त्यांना कारची धडक लागली नव्हती. या घटनेनंतर तिथल्या स्थानिकांनी रवीनासह चालकाने तिघांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप केला. याप्रकरणी कोणताच एफआयआर दाखल झाला नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;