माझ्या नवऱ्याच्या मागे लागायची काय गरज होती…, गरोदर पत्नीला सोडून राज कुंद्राने धरला शिल्पा शेट्टीचा हात

माझ्या नवऱ्याच्या मागे लागायची काय गरज होती…, गरोदर पत्नीला सोडून राज कुंद्राने धरला शिल्पा शेट्टीचा हात

अभिनेत्री शिल्पा शेट्टी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. शिल्पा हिने 2009 मध्ये उद्योजक राज कुंद्रा याच्यासोबत लग्न केलं. राज याच्यासोबत शिल्पाचं पहिलं लग्न आहे. पण शिल्पा, राज याची दुसरी पत्नी आहे. राज कुंद्रा याच्या पहिल्या पत्नीचं नाव कविता असं आहे. कविता आणि राज यांना एक मुलगी देखील आहे. पण दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. तेव्हा कविता हिने शिल्पा हिच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. माझा संसार शिल्पा हिच्यामुळे तुटला… असं कविता एका मुलाखतीत म्हणाली होती. पण राज – कविता यांच्या घटस्फोटाला तीन वर्ष झाल्यानंतर शिल्पा हिने राज याच्यासोबत लग्न केलं.

शिल्पा शेट्टी हिची आयुष्यात एन्ट्री होण्याआधी राज पहिली पत्नी कविता हिच्यासोबत राहात होता. जेव्हा शिल्पा आणि राज यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सर्वत्र रंगू लागल्या, तेव्हा कविता हिने अभिनेत्रीवर अनेक गंभीर आरोप केले होते. राज याच्यासोबत घटस्फोटाचं कारण देखील शिल्पा आहे… असं कविता म्हणाली होती.

एका मुलाखतीत कविता, शिल्पा हिच्यावर संताप व्यक्त करत म्हणाली, ‘शिल्पामुळे राज मला आणि माझ्या मुलीला सोडून गेला. शिल्पा शेट्टी अनेकांच्या प्रेरणास्थानी आहे. पण खऱ्या आयुष्यात ती दिसते तशी नाही. तिला कोणीही भेटू शकलं असतं. जगात अनेक सिंगल पुरुष आहेत. तिला माझ्या नवऱ्याच्या मागे जायची काय गरज होती…’

कविता हिने लागवलेले आरोप ऐकल्यानंतर शिल्पा हिला प्रचंड वाईट वाटलं. यावर अभिनेत्री म्हणाली, ‘कविता हिने जे काही वक्तव्य केलं आहे, ते ऐकून मला वाईट वाटलं आहे. तिला चांगल्या प्रकारे माहिती आहे जेव्हा राजच्या आयुष्यातून ती निघून गेली, तेव्हा मी राजला ओळखत देखील नव्हती…’

यावर राज याने देखील मोठा खुलासा केला होता. ‘शिल्पा हिच्यासोबत भेट होण्याच्या 12 महिन्यांपूर्वी कवितासोबत माझा घटस्फोट झाला होता. कविता आणि माझं नातं शिल्पामुळे नाही तुटलं.’ असं देखील राज कुंद्रा म्हणाला होता. शिल्पा – राज यांची लव्हस्टोरी एका सिनेमाच्या कथेपेक्षा कमी नाही. एकमेकांवर अनेक आरोप-प्रत्यारोप लावल्यानंतर देखील दोघांनी एकमेकांची साथ सोडली नाही. आज दोघेही आनंदी आयुष्य जगत आहेत.

शिल्पा – राज यांना एक मुलगा आहे. त्याचं नाव वियान असून 2020 मध्ये त्याचा जन्म झाला. त्यानंतर सरोगेसीच्या माध्यमातून अभिनेत्रीने मुलीला जन्म दिला. शिल्पाच्या मुलीचं नाव समीशा असं आहे. शिल्पा कायम मुलांसोबत फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. एवढंच नाहीतर, अनेक ठिकाणी अभिनेत्रीला मुलांसोबत आणि पतीसोबत स्पॉट केलं जातं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;