कारवाईची भीती दाखवून पैसे उकळले 

कारवाईची भीती दाखवून पैसे उकळले 

कारवाईची भीती दाखवत व्हेरिफिकेशनच्या नावाखाली तरुणीच्या बँक खात्याचा तपशील घेऊन तिच्या खात्यातून पैसे काढल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

तक्रारदार तरुणीला गुरुवारी एका कुरिअर कंपनीच्या नावे फोन आला. इराणला जे पार्सल पाठवले आहे,  त्या पार्सलमध्ये एलएसडी ड्रग, लॅपटॉप आणि काही वस्तू आहेत. सायबर विभागात फोन ट्रान्सफर करत असल्याचे सांगून त्याने फोन कट केला. त्यानंतर तरुणीला पुन्हा एकाचा फोन आला. फोनवर बोलणाऱ्या दोघांनी त्यांची नावे प्रदीप सावंत आणि मिलिंद भारंबे अशी सांगितली.  तुमच्या आयडीचा गैरवापर होत असून त्याचे व्हेरिफिकेशन करणे गरजेचे आहे अशा भूलथापा मारल्या. fिव्हडीओ कॉलवर ठगाने तरुणीकडे तिच्या बँक खात्याची माहिती मागितली. तसेच मेसेजवर आलेला ओटीपी हा व्हेरिफिकेशनसाठी घेतला. ओटीपी शेअर करताच महिलेच्या खात्यातून 1 लाख 52 हजार रुपये काढले गेले. याबाबत तिने ठगांना विचारणा केली. त्या खात्यातील पैसे अवैध प्रकारचे आहेत. ते पैसे आरबीआयच्या माध्यमातून तपासले जातील आणि त्यानंतर ते पैसे पुन्हा खात्यात येतील असे सांगून ठगाने फोन कट केला. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने तिने वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेतली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;