अर्थवृत्त – मुंबई-पुण्यात घर घेता का घर; बिल्डरांची 4.68 लाख घरे विक्रीच्या प्रतीक्षेत

अर्थवृत्त – मुंबई-पुण्यात घर घेता का घर; बिल्डरांची 4.68 लाख घरे विक्रीच्या प्रतीक्षेत

मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे शहर, नवी मुंबईसह देशातील प्रमुख सात शहरांत घरांची विक्री मंदावली आहे. 2019 च्या तुलनेत न विक्री झालेल्या घरांची संख्या 24 टक्क्यांनी वाढली आहे. विकासकांनी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात घरे बांधून ठेवली आहेत की, ही घरे विकण्यासाठी 22 महिने लागतील. विक्री न झालेल्या घरांची संख्या जवळपास 4 लाख 68 हजारांपर्यंत पोहोचली आहे. मुंबई, पुणे, दिल्ली-एनसीआर, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता या प्रमुख शहरांचा समावेश आहे. या ठिकाणी घरे बनवून तयार आहेत, परंतु किमती जास्त असल्यामुळे घरे विक्री होत नाहीत. घरे तयार असूनही ती विक्री होत नाहीत, अशा घरांच्या विक्रीत 31 टक्के कमी आली आहे. गेल्या आठ तिमाहीतील नोंदणी सरासरी विक्रीवर आधारित आहे. या आकडेवारीत केवळ अपार्टमेंट फ्लॅटचा समावेश आहे.

इक्सिगोचा ‘आयपीओ’

पर्यटनाशी संबंधित सेवा देणारे संकेतस्थळ इक्सिगोचा  आयपीओ 10 जूनपासून सुरू होत आहे. पुढील तीन दिवस म्हणजे 12 जूनपर्यंत आयपीओसाठी अर्ज करता येईल. यासाठी कंपनीने प्रति शेअरची किंमत 88 रुपये ते 93 रुपये ठेवली आहे.

वेल्सवर चर्चा

वेल्सचे चीफ सायण्टिफिक अडवायजर (सीएसए) प्रा. जॅस पाल बादयाल, एफआरएस यांनी  प्रा. अजय के. सूद, एफआरएस यांची भेट घेतली. या भेटीत वेल्सची अर्थव्यवस्था, मेड-टेक आणि ऍग्री-टेक क्षेत्रांबाबत चर्चा करण्यात आली.

किड्झेनियाचे पर्यटन

किड्झेनियाने मध्य प्रदेश सरकारच्या पर्यटनसोबत भागीदारीची घोषणा केली. मुंबई, दिल्ली-एनसीआर येथे मध्य प्रदेश टुरिझम एक्सपीरियन्स सेंटर स्थापन करण्यासाठी किड्झेनियाच्या वतीने सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

‘रुपी112’चे उद्दिष्ट

रुपी 112 या कर्ज देणाऱ्या, आरबीआय नोंदणीकृत गैर-बँकिंग आर्थिक कंपनीने पुढील तीन वर्षांत 1000 कोटी रुपये उत्पन्न आणि 3 लाख कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. यावेळी रुपी112 चे संस्थापक विकास गोयल यांनी सांगितले.

टोयोटाची सेकंड हँड कार घ्या बिनधास्त

टोयोटा किर्लेस्कर मोटरने नुकतेच नकी दिल्ली येथे कंपनीच्या मालकीच्या टोयोटा युज्ड कार आउटलेटचे उद्घाटन केले. हे देशातील दुसरे आऊटलेट आहे, ज्याचे ब्रँड नाव टोयोटा यू ट्रस्ट असे आहे. ग्राहकांना उच्च दर्जाच्या आणि सुरक्षित कापरलेल्या कार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, यू ट्रस्ट टोयोटा कार खरेदी आणि किक्रीची प्रक्रिया सुलभ करते. येथून खरेदी केलेल्या गाडय़ांना 30 हजार किमी किंका दोन कर्षांपर्यंतची कॉरंटी आणि देशभरातील कोणत्याही टोयोटा सेका केंद्राकर तीन किनामूल्य सेका आहेत.

गुगल आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीत कर्मचारी कपात

मायक्रोसॉफ्ट आणि गुगल कंपनीत लवकरच कर्मचारी कपात करण्यात येणार आहे. कॉस्ट कटिंगच्या नावावर काही कंपन्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. मायक्रोसॉफ्ट कंपनीने 2023 मध्ये जवळपास 10 हजार कर्मचाऱ्यांना बाहेर काढले होते. आता पुन्हा एकदा वेगवेगळ्या विभागातील हजारो कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात येणार आहे. कर्मचारी कपात ही नियमांचा भाग आहे, असे कंपनीने म्हटले आहे, तर दुसरीकडे गुगल कंपनीही कर्मचारी कपात करण्याच्या तयारीत आहे. गुगलमध्ये काम करणाऱ्या 100 कर्मचाऱ्यांना पिंक स्लिप देण्यात आली आहे.

महाराजा कंपनीची नवी अगरबत्ती

महाराजा अगरबत्ती कंपनीने स्वामी आणि सुखड चंदन प्युअर ब्रँडची अगरबत्ती बाजारात आणली आहे. या अगरबत्तीला नैसर्गिक सुगंध आहे. या अगरबत्तीच्या मनमोहक सुगंधाने देवाची प्रार्थना करताना मन अगदी प्रसन्न राहते. ही अगरबत्ती 50 ग्रॅम, 100 ग्रॅम आणि 250 ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे. महाराजा कंपनीची अगरबत्ती खरेदी करताना कंपनीचा लोगो पाहून खरेदी करावी असे कंपनीने म्हटले आहे.

 संपर्क –  8369185071.

कल्याण ज्वेलर्सचा करार

कल्याण ज्वेलर्स इंडियाने कॅन्डियरचे संस्थापक रूपेश जैन यांच्या सोबत करार केला. याअंतर्गत कल्याण ज्वेलर्सची उपकंपनी कॅन्डियरमधील 15 टक्के उर्वरित हिस्सा 42 कोटी रुपयांना खरेदी केला जाणार आहे. या वेळी कल्याण ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक टी. एस. कल्याण रामन उपस्थित होते. कॅन्डियरचे देशभरात 11 शोरूम आहेत. कॅन्डियरने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 130.3 कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्न नोंदवले होते.

द बॉडी शॉप स्टोअरमध्ये ब्रेल लिपी

दृष्टिदोष असलेल्या ग्राहकांना सर्वोत्तम शॉपिंग अनुभव देण्यासाठी द बॉडी शॉप स्टोअरमध्ये ब्रेल लिपीचा प्रयोग करण्यात आला आहे. द बॉडी शॉपने हा प्रयोग आपल्या 18 व्या वर्धापनदिनी केला. देशभरातील स्टोअर्समध्ये टप्प्याटप्प्याने हे राबविले जाणार आहे.  या वेळी दक्षिण आशियाच्या मुख्य ब्रँड अधिकारी श्रीमती हरमित सिंग उपस्थित होत्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;