पहिल्या ड्रीम स्पोर्ट्स 17 वर्षांखालील फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत पंजाब एफसी संघाला विजेतेपद

पहिल्या ड्रीम स्पोर्ट्स 17 वर्षांखालील फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत पंजाब एफसी संघाला विजेतेपद

पहिल्या ड्रीम स्पोर्ट्स 17 वर्षांखालील फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीत पंजाब एफसी संघाने ईस्ट बंगाल एफसी संघाचा 1-0 असा सनसनाटी पराभव करून विजेतेपद पटकावले. मुंबई येथील कूपरेज फुटबॉल मैदानावर झालेल्या या अंतिम फेरीच्या लढतीत अर्शवीर सिंग याने नोंदवलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर पंजाब एफसी संघाने ईस्ट बंगाल एफसी संघाचा 1-0 असा पराभव केला. सामन्यात दोन्ही संघानी तोडीस तोड खेळ केला. 21 व्या मिनिटाला स्पर्धेतील सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम नावावर असलेल्या देबोजित रॉयने मारलेला चेंडू ईस्ट बंगाल एफसीचा गोलरक्षक विश्वजित यादवने अडविला. यादवने पुन्हा एकदा 27 व्या मिनिटाला गुरनाज सिंग ग्रेवालच्या पासवरील रॉयचे आक्रमण परतवून लावले.

पूर्वार्धात इंज्युरी टाइममध्ये मध्यरक्षक अर्शवीर सिंग याने मिळालेल्या संधीचे सोने करत पेनल्टी बॉक्सच्या बाजूने गोलच्या दिशेने मारलेला चेंडू ईस्ट बंगालच्या गोलरक्षक दीप बर्मनला अडविण्यात अपयश आले व पंजाब एफसी संघाने खाते उघडले. उत्तरार्धात, आघाडीवर असलेल्या पंजाब एफसीच्या खेळाडूंनी प्रतिस्पर्धी संघाला फारशी संधी दिली नाही. 59 व्या मिनिटाला पंजाब एफसीच्या विशाल यादवने सुरेख चाल रचत सिंगम्यूट शमीला पास दिला. पण त्याला त्याचे गोलात रूपांतर करण्यास अपयश आले. पंजाब एफसीच्या आघाडीच्या फळीचे आक्रमण ईस्ट बंगालच्या गोलरक्षक दिप बर्मनने दोन वेळा थोपवून धरले.

विजेतेपदानंतर अर्शवीर सिंग म्हणाला की, माझ्या जीवनात पहिल्यांदाच मी अंतिम सामन्यात अशी चमकदार कामगिरी केल्यामुळे मी खूप भारावून गेलो आहे. माझ्या संघातील सर्व खेळाडूंचा मला अभिमान वाटतो. आम्ही चांगली कामगिरी केली. देशभरात प्रसारित होत असलेल्या प्रतिष्ठेच्या अशा स्पर्धेत चमकदार केली हि खरच मोठी गोष्ट आहे. माझ्यासारख्या युवा खेळाडूंना असा अनुभव मिळणे खूप चांगली बाबी आहे.

भारताचा माजी गोलरक्षक सुब्रता पॉल याच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी सुब्रता पॉल म्हणाला की, अंतिम लढत अतिशय चुरशीची झाली. भविष्यात या सर्व खेळाडूंना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. ड्रीम स्पोर्ट्स फाउंडेशनने घेतलेल्या या उपक्रमाबद्दल त्यांचे देखील मी आभार मानतो. आपल्या खेळाडूंच्या विकासासाठी अधिकाधिक अशा स्पर्धा आयोजित करणे महत्वाचे आहे. युवा खेळाडूंना अधिकाधिक सामने खेळणारे गरजेचे आहे. कारण सामने खेळूनच त्यांचा विकास होणारं आहे आणि त्यातून त्यांना देशासाठी खेळण्याची संधी मिळू शकते.

प्लेअर ऑफ द टूर्नामेंट: देबोजित रॉय
सर्वोत्कृष्ट गोलरक्षक: विश्वजीत यादव
सर्वाधिक गोल करणारा खेळाडू: देबोजित रॉय
सामनावीर(अंतिम सामना): परमवीर सिंग.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;