शिर्डी मतदार संघात मोदींची नव्हे तर मतदारांची गॅरंटी चालली

शिर्डी मतदार संघात मोदींची नव्हे तर मतदारांची गॅरंटी चालली

पंतप्रधान मोदींची गॅरंटी, हक्काचा विकास, रखडलेले पाटपाण्याचे प्रश्न, गॅस पेट्रोल डिझेलचे वाढलेले दर, शेतकऱ्यांच्या कांदा व इतर मालाला योग्य भाव नाही, शाश्वत रोजगार हा सगळा करिश्मा थेट मतदारांपर्यंत पोहोचविण्यांत स्थानिक पातळीवर कार्यरत असलेल्या नेत्यांना आलेले अपयश आणि दुसऱ्या बाजुला आरक्षित मतदार संघातील खासदार हे मनांत बिंबलेले समिकरण यामुळे भरोशाच्या 2 लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर पराभवाची नामुष्की आली आहे. त्यामुळे मोदींसह कोणाचीही गॅरंटी चालली नाही गॅरंटी चालली की मतदारांची.

सहकार शेतकरी पटटयातील निवडणुका म्हटल्या की, दिमतीला गाडया, घोडया आणि बख्खळ मजा हे गणित नेहमीच ठरलेलं असतं, पण शिर्डी लोकसभा मतदार संघ आरक्षीत झाल्यांने त्याला अपवाद ठरला. मोदी करिष्म्यांने अवघ्या 14 दिवसांत खासदार झालेले लोखंडे मतदार संघात भेटत नाही, दिसत नाही हा मुद्दा, केंद्र स्तरावर निर्माण झालेल्या समस्या सुटत नाही त्यामुळे दगडापेक्षा वीट मउ म्हणून मतदारांनी भाउसाहेब वाकचौरे यांना जवळ करत त्यांना निवडुन दिले.

वंचित आघाडीच्या उत्कर्षा रूपवते यांना मतदारांनी सपशेल नाकारले, त्यांना होणारे मतदान उबाठांने आपल्याकडे वळविण्यांत यश मिळवत शिर्डी लोकसभा मतदार संघात भाऊसाहेब वाकचौरे दुसऱ्यांदा खासदार व विजयाची गुढी उभारली. शेतमालाला भाव नाही, वाढती महागाई, डिझेल पेट्रोलच्या गगनाला भिडणा-या किंमती, विशिष्ट समाजाचे गठ्ठा मतदान मिळविण्यांत स्थानिक पातळयावर केले गेलेले प्रयत्न, विकासाचे कुठले प्रश्न सोडविणार याबाबत शेवटपर्यंत न झालेली चर्चा, देशाचे भवितव्य घडविणारी निवडणुक यापेक्षा दैनंदिन जीवनांत सर्वसामान्यांना बसणा-या झळा केंद्रातील मोदी सरकारमुळे बसत असल्याची भावना वाढविण्यांबाबत केला गेलेला प्रचार या सगळ्याचा फटका महायुती आणि त्यांच्या नेत्यांना बसला आहे.

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विजयाने कोपरगाव मध्ये मोठा जल्लोष करण्यात आला, फटाक्यांची आतिषबाजी गुलालाची उधळण करीत महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. वाकचौरेच निवडून येणार हे प्रथम पासून त्यांचे कार्यकर्ते ठासून सांगत होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;