राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येऊदे, निलेश लंके यांनी मोहटा देवीला घातले साकडे

राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येऊदे, निलेश लंके यांनी मोहटा देवीला घातले साकडे

लोकसभा निवडणुकीत नगर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदावर निलेश लंके विजयी झाले. खासदार म्हणून निवडून आल्या नंतर निलेश लंके यांनी प्रथमच मोहटा देवीच्या गडावर जाऊन देवीचे दर्शन घेतले.

खासदार म्हणून निवडणून आल्यानंतर निलेश लंके यांनी प्रथमच कार्यकर्त्यांसमवेत मोहटा देवी गडावर जाऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी निलेश लंके यांनी इंडिया आघाडीचे सरकार केंद्रात येऊदे असे साकड मोहटा देवीला घातले. देवीचे दर्शन घेतल्यानंतर लंके यांनी स्थानिकांशी संवाद साधला. “माझी मोहटा देवीवर मोठी श्रद्धा आहे. म्हणूनच मी प्रत्येक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी व मतमोजणीच्या आदल्या दिवशी देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी येत असतो. या लोकसभा निवडणुकीत मतमोजणीच्या आधीच्या मध्यरात्री देवीच्या दर्शनासाठी आलो होते. या ठिकाणी आल्यानंतर मला मनशांती मिळते. आज मी केंद्रात इंडिया आघाडीचे शासन येऊ दे, माझ्या मतदारसंघातील व देशातील वातावरण आनंदात राहूदे, जातिभेदाला मुठमाती मिळू दे असे साकडे देवीला घातले आहे. तसेच या वेळी विधानसभा निवडणुकीत शरद पवार, उद्धव ठाकरे व काँग्रेसची सत्ता राज्यात पुन्हा येणार ही काळ्या दगडावरीच पांढरी रेघ आहे. राज्यात आमचेच सरकार येणार, ” असे साकडे देवीला घातल्याचे यावेळी लंके म्हणाले.

देवीचे दर्शन घेऊन झाल्यानंतर अर्जुन धायतडक मित्रमंडळाच्या वतीने लंके यांची पेढेतुला करण्यात आली. तसेच देवस्थानच्या वतीने देवस्थानचे मुख्यकार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी लंके यांचा सत्कार केला. यावेळी लंके यांच्या सोबत प्रताप ढाकणे, राफिक शेख, शिवशंकर राजळे, बंडुपाटील बोरुडे, अर्जुन धायतडक, राजेंद्र दौण्ड, गहिनीनाथ शिरसाठ, राजेंद्र ढाकणे, उद्धव दुसंग, इलियास शेख आणि बालासाहेब लवांडे हे उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;