किंगमेकर चंद्राबाबू मालामाल; एक्झिट पोलनंतर शेअर बाजारातून केली 870 कोटींची कमाई

किंगमेकर चंद्राबाबू मालामाल; एक्झिट पोलनंतर शेअर बाजारातून केली 870 कोटींची कमाई

लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपला सत्ता स्थापनेसाठी टीडीपी आणि जदयू यांची गरज लागत आहेत. त्यामुळे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. चंद्राबाबूंच्या पक्षाला 16 जागा मिळाल्याने सत्तास्थापनेसाठी ते किंगमेकर ठरत आहेत. त्यामुळे त्यांचे राजकीय वजन वाढले आहे. तसेच या पाच दिवसात ते चांगलेच मालामाल झाले आहेत. एक्झट पोलच्या अंदाजनंतर त्यांच्या शेअरचे भाव गगनाला भिडले असून त्यांच्या कुटुंबाने गेल्या 5 दिवसांत शेअर बाजारातून सुमारे 870 कोटी रुपये कमावले आहेत.

चंद्राबाबू नायडू यांनी 1992 मध्ये ‘हेरिटेज फूड्स’ कंपनीची स्थापना केली होती. ही कंपनी डेअरी उत्पादनांचा व्यवसाय करते. लोकसभेचे निकाल जाहीर झाल्यानंतर गेल्या 5 दिवसांपासून त्यांचे शेअर्सचे भाव गगनाला भिडत आहेत. गेल्या 5 दिवसात त्यात सुमारे 55 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एक्झिट पोलने नायडूंच्या तेलुगु देसम पक्षाच्या विजयाचा अंदाज वर्तवल्यानंतर दोन दिवसांनी हेरिटेज फूड्सचे शेअर्स 3 जून रोजी 424 रुपयांवर व्यवहार करत होते. तेव्हापासून हा शेअर सातत्याने वाढत आहे. आज शुक्रवारी तो 661.25 रुपयांवर बंद झाला. जो आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर आहे. या वाढीसह हेरिटेज फूड्सचे बाजार भांडवल या आठवड्यात 2,400 कोटी रुपयांनी वाढले आहे. कंपनीचे मार्केट कॅप 7 जून रोजी 6,136 कोटी रुपये झाले, जे एका आठवड्यापूर्वी 3,700 कोटी रुपये होते.

एक्सचेंजवर उपलब्ध माहितीनुसार, चंद्राबाबू नायडू यांच्या कुटुंबाकडे हेरिटेज फूड्समध्ये 35.7 टक्के हिस्सा आहे. त्यांची पत्नी भुवनेश्वरी यांच्याकडे 24.37 टक्के, तर मुलगा लोकेश आणि सून ब्राह्मणी यांच्याकडे अनुक्रमे 10.82 टक्के आणि 0.46 टक्के हिस्सा आहे. नायडू यांचा नातू देवांश यांचा या डेअरी कंपनीत 0.06 टक्के हिस्सा आहे. हेरिटेज फूड्सच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याने चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नी भुवनेश्वरी यांच्या संपत्तीत गेल्या 5 दिवसांत 579 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तर उर्वरित कुटुंबातील सदस्यांच्या संपत्तीत या काळात 291 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या कालावधीत कुटुंबातील सर्व सदस्यांच्या संपत्तीत 870 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

नायडू यांच्या पक्षाला लोकसभेच्या 16 जागा आहेत. त्यामुळे आता भाजप सरकार स्थापन करण्यासाठी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. यामुळे राष्ट्रीय राजकारणात चंद्राबाबू नायडू यांचा दर्जा लक्षणीयरीत्या वाढला. तसेच या पाच दिवसात शेअर बाजारातूनही त्यांनी जबरदस्त कमाई केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;