IND Vs PAK : सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचे सावट; कडेकोट सुरक्षा, नो फ्लाय झोन घोषित

IND Vs PAK : सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचे सावट; कडेकोट सुरक्षा, नो फ्लाय झोन घोषित

हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान हा टी20 वर्ल्ड कपमधील सर्वात मोठा सामना 9 जून 2024 (रविवारी) होणार आहे. मात्र या हायहोल्टेज सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचे सावट असून तसा संदेश ISIS ने जारी केला होता. हा हल्ला ‘लोन वुल्फ’ प्रकारचा असल्याचे सांगितले जात आहे.

T20 World Cup 2024 मध्ये मोठमोठे उलटफेर होताना पाहायला मिळत आहेत. अमेरिकेने पाकिस्तानला नमवत सर्वांनाच मोठा धक्का दिला. पाकिस्तानचा पुढचा सामना टीम इंडिया विरुद्ध 9 जून रोजी होणार आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांचे राजकीय संबंध चांगले नाहीत. त्यामुळे या हायहोल्टेज सामन्यावर पोलिसांची करडी नजर असणार आहे. अशातच या सामन्यावर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देणारा देणारा एक संदेश ISIS ने जारी केला आहे. लोन वुल्फ प्रकारच्या या दहशतवादी हल्ल्यात प्रामुख्याने एका व्यक्तीकडून हल्ला केला जातो. त्यामुळे न्युयॉर्कमध्ये जागोजागी पोलिसांनी गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. विशेष करुन नसाउ काउंटी स्टेडियमच्या आसपास मोठ्या संख्यने पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

या संदर्भात नसाउ काउंटी चे पोलीस अधिकारी पॅट्रिक रायडर यांनी माहिती दिली. “आम्ही सुरक्षा व्यवस्थेवर बारीक लक्ष ठेवून आहोत. आम्ही आमच्या सहकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहोत, जे आम्हाला वेळोवेळी योग्य माहिती देत ​​आहेत. त्यामुळे आम्ही गुप्त पद्धतीने सुद्धा देखरेख ठेवत आहोत. सध्या सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे,” अशी माहिती पॅट्रिक रायडर यांनी दिली.

हिंदुस्थान-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी ज्यांच्याकडे तिकीट नसेल अशा चाहत्यांसाठी मैदानाच्या जवळ सीडर पार्क येथे मोठ्या स्क्रिनवर सामना पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी सुद्धा कडेकोट सुरक्षा व्यवस्था असणार आहे. तसेच सामन्याच्या दिवशी नसाउ काउंटी स्टेडियमच्या आसपासचा संपूर्ण परिसर नो फ्लाय झोन घोषित करण्यात आलेला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;