इन्स्टाग्रामवरील जाहिरातीवर क्लीक केलं, मिठाई व्यावसायिकाची 11 लाखांची फसवणूक
On
कुवारबाव येथील मिठाई व्यावसायिक इन्स्टाग्रामवरील कर्ज मिळण्याच्या जाहिरातीला बळी पडला आहे. यामध्ये त्यांची 11 लाख 60 हजार 674 रुपयांची फसवणूक झाली. शहर पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 15 मार्च ते 17 एप्रिल 2024 या कालावधीत कुवारबाव परिसरात घडली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी राणाराम काळुराम रायका (38,रा. कुवारबाव, रत्नागिरी) यांनी मोबाईलवरील इन्स्टाग्राम अॅपवर कर्ज मिळेल अशी जाहिरात पाहिली. त्यावरील मोबाईलवर फोन केल्यावर त्यांना अज्ञाताने लोन मिळेल असे आमिष दाखवत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर संशयिताने आपला क्युआर कोड देऊन प्रथम 5 हजार नंतर इन्शूरन्ससाठी 38 हजार रुपये गुगल पेव्दारे घेतले. त्यानंतर फिर्यादी राणाराम रायका यांनी वेळोवेळी गुगलपेव्दारे 6 लाख 23 हजार 884 आणि आपल्या दोन मित्रांच्या बँक खाते आणि एअरटेल पेमेंटव्दारे संशयिताला 3 लाख 63 हजार 290 असे एकूण 11 लाख 60 हजार 674 रुपये ऑनलाईन पध्दतीने पाठवले. ऐवढे पैसे देऊनही कर्ज न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच राणाराम रायका यांनी बुधवारी (ता. 5) शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List