अयोध्येच्या पराभवातून काय शिकावं? ‘शक्तीमान’ची पोस्ट चर्चेत

अयोध्येच्या पराभवातून काय शिकावं? ‘शक्तीमान’ची पोस्ट चर्चेत

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या अनेक उमेदवारांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. राम मंदिर उभारणीनंतर अवघ्या काही महिन्यांनी अयोध्येमध्ये भाजपचा उमेदवार पराभूत झाला. यावर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लहरी यांनीसुद्धा अयोध्येच्या निकालावर संताप व्यक्त केला होता. त्यानंतर आता ‘शक्तीमान’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेते मुकेश खन्ना यांची पोस्ट चर्चेत आली आहे. मुकेश खन्ना यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर राम मंदिराचा फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अयोध्येत भाजपच्या पराभवाचं कारण सांगितलं आहे.

मुकेश खन्ना यांची पोस्ट-

‘अयोध्या निवडणुकीतील पराभवातून आपण हे शिकायला हवं की भव्य मंदिरासोबतच आसपासच्या शहरवासीयांचं जीवनही भव्य बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोट्यवधींच्या बजेटमध्ये तिथल्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी काही कोटी रुपये बाजूला ठेवावेत, मग ते राम मंदिर असो, चार धाम असो किंवा जयपूरजवळचं खाटू शामचं मंदिर असो.. श्रद्धेच्या स्थळांना टूरिस्ट स्पॉट बनू देऊ नका. तिथे लोकसुद्धा राहतात, त्यांची काळजी घ्या’, असं त्यांनी लिहिलं. त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mukesh Khanna (@iammukeshkhanna)

22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला होता. त्यावेळी अयोध्येचा कायापालट कशा पद्धतीने झाला, याची तुफान चर्चा रंगली होती. त्यामुळे अयोध्येत भाजपचा विजय नक्कीच होईल, असा विश्वास अनेकांना होता. मात्र प्रत्यक्षात निकाल पाहिल्यानंतर लोकांना आश्चर्याचा धक्का बसला.

याआधी सुनील लहरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित अयोध्येतील लोकांवर संताप व्यक्त केला होता. रामायणाचा संदर्भ देत सुनील लहरी यांनी लिहिलं होतं, ‘आम्ही हे विसरलो की हे तेच अयोध्यावासी आहेत, ज्यांनी वनवासातून आल्यानंतर सीता मातेवर शंका घेतली होती. जी व्यक्ती देव प्रकट झाल्यावर त्यांना नकार देत असले तर अशा व्यक्तीला काय म्हणतात? स्वार्थी! इतिहास साक्षीदार आहे की अयोध्येतील लोकांनी नेहमीच त्यांच्या खऱ्या राजासोबत विश्वासघात केला आहे. धिक्कार आहे!’

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;