‘देश चालवण्यासाठी सर्वमत महत्त्वाचं असतं’…दहा वर्षांनंतरचा शाब्दिक बदल; अंबादास दानवेंचा टोला

‘देश चालवण्यासाठी सर्वमत महत्त्वाचं असतं’…दहा वर्षांनंतरचा शाब्दिक बदल; अंबादास दानवेंचा टोला

लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निकालने भाजपला धक्का बसला आहे. 400 पारच्या वलग्ना करणाऱ्या भाजपला स्वबळावर बहुमतही मिळवता आलेले नाही. या निकालातून जनतेने भाजपला नाकारल्याने स्पष्टपणे दिसत आहे. मात्र, सत्तास्थापनेसाठी नरेंद्र मोदी आता एनडीएचा राग आवळत आहेत. त्यांच्या भाषणात आधी फक्त भाजप एके भाजपच असायचे. आता ते एनडीएचा उल्लेख करत आहेत. मोदींमध्ये झालेल्या या शाब्दिक बलावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजप आणि मोदींना जबरदस्त टोला लगावला आहे.

अंबादास दानवे यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘देश चालवण्यासाठी सर्वमत महत्वाचं असतं’…दहा वर्षांनंतर झालेला हा शाब्दिक बदल.. निकालांच्या आकड्याने हा बदल घडवलेला स्पष्ट दिसतोय..असे दानवे यांनी म्हटले आहे. मोदींना आता सत्तास्थापनेसाठी इतप पक्षांची मदत लागत आहे. त्यामुळे ते आता एनडीएचा राग आवळत आहेत. याआधी ते बहुमतात असल्याने त्यांनी एनडीएकडे लक्ष दिले नव्हते. देशात फक्त भाजप हाच एकच पक्ष राहील, असे भाजपचे अध्यक्ष म्हणत होते. तसेच निवडणुकीआधी त्यांनी 400 पारच्या वल्गनाही केल्या होत्या. मात्र, आता जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. मोदींमध्ये झालेल्या या शाब्दिक बदलावरून दानवे यांनी हा टोला लगावला आहे.

हिंदुस्थानच्या राजकीय इतिहासात निवडणूकपूर्व आघाडी म्हणून एनडीए यशस्वी झाली, तेवढे कोणीच यशस्वी होऊ शकले नाही. एनडीएच्या विजयाने आपण बहुमत मिळवले आहे. सरकार चालवण्यासाठी बहुमत गरजेचे आहे. लोकशाहीचा तोच एक सिद्धांत आहे. पण देश चालवण्यासाठी सर्वमत आवश्यक आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर दानवे यांनी टोला लगावत लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर मोदींमध्ये शाब्दिक बदल झाला आहे, असे म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;