समोरून जाणाऱ्या कंगनाला चिरागने दिला आवाज; घेतली गळाभेट, व्हिडीओ तुफान व्हायरल

समोरून जाणाऱ्या कंगनाला चिरागने दिला आवाज; घेतली गळाभेट, व्हिडीओ तुफान व्हायरल

हिमाचल प्रदेशातील मंडी या मतदारसंघातून निवडणूक जिंकल्यानंतर अभिनेत्री कंगना राणौत दिल्लीला पोहोचली आहे. यावेळी तिची भेट माजी सहकलाकार आणि राजकारणी चिराग पासवान यांच्याशी झाली. लोकसभा निवडणुकीच एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर आता नव्या सरकार स्थापनेत्या तयारीला जोरदार सुरुवात झाली. यासाठी दिल्लीत एनडीएच्या संसदीय पक्षाच्या नेता निवडीची बैठक पार पडली. या बैठकीला एनडीएचे सर्व खासदार उपस्थित होते. निवडणूक जिंकल्यानंतर कंगनासुद्धा पहिल्यांदाच या बैठकीला उपस्थित राहिली. तिथेच तिची भेट चिराग पासवान यांच्याशी झाली.

सध्या सोशल मीडियावर कंगना आणि चिराग पासवान यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एनडीएच्या बैठकीसाठी आलेले चिराग पासवान हे माध्यमांसमोर पोझ देत असतात. त्याच वेळी कंगना तिथून जात असते. कंगनाला पाहून चिराग आवाज देऊन तिला बोलावतात आणि निवडणूक जिंकल्यानिमित्त अभिनंदन करतात. बिहारच्या हाजीपूर मतदारसंघातून निवडणूक जिंकून खासदार बनलेले चिराग पासवान हे लोक जनशक्ती पार्टीचे (रामविलास) अध्यक्ष आहेत. केंद्रीय मंत्री राहिलेले दिवंगत रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग यांची पार्टी एनडीएचा एक भाग आहे. तेसुद्धा एनडीएच्या संसदीय पक्षाच्या नेता निवडीच्या बैठकीला पोहोचले होते.

राजकारणात पाऊल ठेवण्यापूर्वी चिराग पासवान यांनी अभिनयक्षेत्रात नशीब आजमावलं होतं. 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मिले ना मिले हम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात कंगनाने चिरागच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. त्यानंतर चिरागसुद्धा अभिनयक्षेत्रात फारशी कामगिरी करू शकले नाहीत. मात्र 2014 मध्ये आपल्या वडिलांचा राजकीय वारसा सांभाळायला घेतलेल्या चिराग यांचं राजकारणातील करिअर मात्र सुपरहिट चालत आहे.

दुसरीकडे कंगनाने बॉलिवूड इंडस्ट्रीत अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. ‘क्वीन’ या चित्रपटातील जबरदस्त अभिनयामुळे ती ‘बॉलिवूडची क्वीन’ म्हणूनही ओळखली जाऊ लागली. कंगना नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची समर्थक राहिली आहे. अखेर यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी तिने भाजपात प्रवेश केला आणि मंडी या मतदारसंघातून निवडणूक लढवली. पहिल्याच प्रयत्नात कंगनाचा विजय झाला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;