महायुतीत कुरघोडी, अजित पवार गटाच्या आमदाराला धक्का! पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्याची मागणी

महायुतीत कुरघोडी, अजित पवार गटाच्या आमदाराला धक्का! पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्याची मागणी

नगरमध्ये महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप असताना भाजपच्या पंकजा मुंडे यांना तिकीट देण्याची मागणी करण्यात येत आहे. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. त्यामुळे आता महायुतीत अंतर्गत कुरघोडी सुरू झाल्या आहेत.

लोकसभेच्या निवडणुकीनंतर नगर जिल्ह्यामध्ये अनेक राजकीय उलथापालथ होणार, हे निश्चित झाले होते. विखे यांचा दारुण पराभव झाल्यानंतर नगरचे समीकरण बदलणार व त्यामध्ये आता स्थानिक पातळीवर सुद्धा निवडणुका होणार आहेत. तेथे सुद्धा महाविकास आघाडीने एकत्रितपणे निवडणुका लढवण्याचा निश्चय जाहीर केलेला असतानाच दुसरीकडे महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चलबिचल व कुरघोडी सुरू झालेल्या आहेत. गेल्या दोन टर्मपासून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप हे नगर शहरातून निवडून आलेले आहेत. या निवडणुकीमध्ये भाजप व अजित पवार गट हे एकत्रितरित्या विखे पाटलांच्या प्रचारामध्ये सहभागी झालेले होते. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना विखे यांना निवडून आणण्यात यश आले नाही.

नगर शहर मतदारसंघांमध्ये मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सुजय विखे यांना निवडून आणण्यासाठी दिवंगत शिवसेनेचे उपनेते माजी मंत्री अनिल राठोड यांनी मोठे मताधिक्य या नगर शहरांमध्ये त्यांना दिले. 54 हजाराचा लीड या नगर शहरातून त्यांना देण्यात आला. यंदा मात्र विखे यांना नगर शहरात अवघे 31 हजार मतांचा लीड मिळालेला आहे. म्हणजेच याचा अर्थ विखे यांचे मताधिक्य हे नगर शहरांमध्ये कमी झाले. हे मताधिक्य कमी करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी याच बरोबरीने काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वांनी एक दिलाने काम केल्यामुळे त्याचा फटका विखे यांना बसला.

आता नगर शहरांमध्ये 31 हजार लीड असल्याने महायुतीमध्ये कुरघोडी सुरू झाली आहे. निकाल लागून अवघे दोन दिवस झाल्यानंतर भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष आगरकर यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना पत्र देऊन पंकजा मुंडे यांना नगर या ठिकाणी विधानसभेची उमेदवारी द्यावी, अशी जाहीर मागणी केलेली आहे. विशेष म्हणजे त्यांना हे पत्र देताना महायुतीचे घटक पक्षाचे आमदार येथे नेतृत्व करतात याचा विसर पडला असावा, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे इतक्या घाईने पत्र देण्याचे कारण काय? अशी सुद्धा चर्चा भाजपमध्ये सुरू झाली आहे. एकंदरीतच निकालानंतर आता भाजपमध्येच नैराश्याचे वातावरण दिसून आलेले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;