हेलनसोबत रिलेशनशिपमध्ये असताना सलमान-अरबाजला बोर्डिंग स्कूलमध्ये का पाठवलं? सलीम खान यांचा खुलासा

हेलनसोबत रिलेशनशिपमध्ये असताना सलमान-अरबाजला बोर्डिंग स्कूलमध्ये का पाठवलं? सलीम खान यांचा खुलासा

अभिनेता सलमान खानचे वडील आणि ज्येष्ठ पटकथालेखक सलीम खान यांनी 1981 मध्ये अभिनेत्री हेलन यांच्याशी दुसरं लग्न केलं. त्यावेळी त्या सलमा खान यांच्याशी आधी विवाहित होते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सलीम खान हे त्यांच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. अरबाज खानच्या ‘द इन्विन्सिबल’ या टॉक शोमध्ये त्यांनी हजेरी लावली होती. यावेळी मुलासोबत विविध विषयांवर गप्पा मारताना अरबाजने त्यांना बोर्डिंग स्कूलविषयी प्रश्न विचारला. हेलन यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना तुम्ही मला आणि सलमानला बोर्डिंग स्कूलमध्ये का पाठवलं, असा सवाल अरबाजने सलीम यांना केला.

सलमान-अरबाजला बोर्डिंग स्कूलमध्ये का पाठवलं?

या प्रश्नाचं उत्तर देताना सलीम खान म्हणाले, “तुमच्या अभ्यासात आणि शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून माझ्याकडे तो एकच मार्ग होता. कारण तुम्हा दोघांवर त्या गोष्टीचा परिणाम झाला असता आणि त्यामुळे अभ्यासात मन लागलं नसतं. पण दोन वर्षांनंतर मी तुम्हाला बोर्डिंग स्कूलमधून घरी घेऊन आलो होतो.” सलीम खान हे सलमा यांच्याशी विवाहित असतानाच हेलन यांच्याशी दुसरं लग्न केलं. अशा परिस्थितीत दोन्ही बाजू कशा पद्धतीने सांभाळल्या, सर्वांना एकत्र ठेवण्यात कसं यश मिळालं, असाही प्रश्न अरबाजने त्यांना विचारला.

दुसऱ्या लग्नानंतर सर्वकाही कसं जुळवून घेतलं?

त्यावर सलीम खान यांनी सांगितलं, “त्यावेळी माझा हेतू काय आहे, हे सर्वांनी समजून घेणं खूप महत्त्वाचं होतं. माझी मुलं, घरातील इतर सदस्य, पत्नी आणि इतर सर्वांना ही गोष्ट समजावी की मला कोणालाच सोडायचं नाही, हे महत्त्वाचं होतं. मला माझ्या कुटुंबालाही एकटं सोडायचं नव्हतं आणि मला हेलनलाही सोडायचं नव्हतं. तुझी आई सलमाने सर्वांत आधी हेलनचा स्वीकार केला आणि नंतर हळूहळू सर्वजण एकत्र राहू लागले.”

याआधी एका मुलाखतीत हेलन यांच्यासोबत लग्नाविषयी सलीम खान मोकळेपणे व्यक्त झाले होते. “माझ्या विवाहित आयुष्यात भ्रमनिरास झाला म्हणून किंवा मी त्रस्त होतो म्हणून हेलनशी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला नव्हता. हेलनशी लग्न करण्याचा निर्णय काही तडकाफडकी घेण्यात आला नव्हता. मी खूप वेळ घेतला होता. माझ्या आयुष्यात हेलन आहे, हे सलमाला सांगणारी पहिली व्यक्ती मीच होतो. दुसऱ्या कोणाकडून किंवा गॉसिप मॅगझिनमधून समजण्याआधीच मी तिला सत्य सांगितलं होतं”, असं सलीम खान म्हणाले होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;