इचलकरंजीत बंद घंटागाडय़ांमागे मोठे अर्थकरण सुरु?  तक्रारीनंतर महापालिका प्रशासनाने केली तपासणी

इचलकरंजीत बंद घंटागाडय़ांमागे मोठे अर्थकरण सुरु?  तक्रारीनंतर महापालिका प्रशासनाने केली तपासणी

घरोघरी जाऊन कचरा गोळा करणाऱया महानगरपालिकेच्या 68 पैकी 20 घंटागाडय़ा वर्षभर बंद असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्याने शासनाकडे केल्यावर महापालिकेला जाग आली. मनपा प्रशासनाने तपासणी करून आठ गाडय़ा बंद असून, याबाबत मत्तेदार कंपनीस दंडात्मक कारवाईची नोटीस दिली आहे, असा अहवाल देत अर्ज निकाली काढला. मात्र, तक्रारदार कार्यकर्त्याने यावर आक्षेप घेत पुन्हा तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, तक्रारीकडे महापालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून, बंद घंटागाडय़ांमागे मोठे अर्थकारण सुरू असल्याची शंका तक्रारदार संतोष हत्तीकर यांनी व्यक्त केली आहे.

इचलकरंजी शहरातील सामाजिक कार्यकर्ते संतोष राजाराम हत्तीकर यांनी घंटागाडय़ा बंदबाबत मनपाकडे तक्रार नोंदवली होती. शहराच्या 26 वार्डातून दररोज घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्यासाठी मनपाने स्वमालकीच्या 68 घंटागाडय़ा व अन्य अशी 75 वाहने ही आदर्श फॅसिलिटी ऍण्ड मॅनेजमेंट सर्व्हिसेस यांना ठेका देताना दिली आहेत. मात्र, वर्षभरापासून यातील 20 घंटागाडय़ा बंद आहेत, अशी तक्रार हत्तीकर यांनी नोंदवली होती. याची मनपाने दखल घेतली नाही म्हणून हत्तीकर यांनी थेट शासनाकडे तक्रार केली. यानंतर मनपा प्रशासन जागे झाले. त्यांनी तपासणी केली आणि आठ घंटागाडय़ा पूर्ण बंद असल्याचा अहवाल दिला आहे. यात पाच घंटागाडय़ांना हौदा नाही, तर चार घंटागाडय़ा राखीव आहेत. तर तीन अन्य कारणाने नादुरुस्त आहेत. तर एक दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये आहे, असे हत्तीकर यांना पत्र देत अर्ज निकाली काढला आहे.

मनपाकडे फेरतक्रार दाखल

मनपाने केलेल्या कार्यवाहीवर हत्तीकर यांनी नाराजी व्यक्त करून पुन्हा तक्रार केली आहे. मूळ तक्रारीबाबत आपल्याकडे भक्कम पुरावे आहेत. आपणास संबंधित विभागाच्या अधिकाऱयांनी खोटी माहिती दिली असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी फेरतक्रार त्यांनी मनपा प्रशासनाकडे केली आहे.

यामागे अर्थकारण असल्याची शंका – संतोष हत्तीकर

संतोष हत्तीकर म्हणाले, इचलकरंजी महापालिकेच्या मालकीच्या या घंटागाडय़ा असून, मत्तेदार कंपनीने त्याची वेळीच देखभाल आणि दुरुस्ती करणे आवश्यक आहे. याबाबत मनपा अधिकाऱयांचे लक्ष नाही. सुमारे एक वर्षापासून हा खेळ चालू आहे. तसेच या कामाची नेमकी बिले काढण्याऐवजी खोटी बिले काढली जातात, अशी चर्चा आहे. बंद घंटागाडय़ांबाबत आपल्याकडे व्हिडीओ शूटिंग आणि तारखेसह फोटो आहेत. यामुळे खोटी माहिती देणाऱयावर आता कारवाई होणे आवश्यक आहे. इचलकरंजी महापालिकेने संबंधित कंपनीला एक वर्षासाठी साडेसात कोटींचा ठेका दिला आहे. या घंटागाडय़ांवर नियमानुसार कर्मचारी नाहीत, निम्मे कर्मचारी प्रत्यक्ष कामावर नाहीत. अनेक घंटागाडी चालकाकडे लायसन्स नाही. याची मनपा प्रशासन तपासणी करत नसून, जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. यामागे मोठे अर्थकारण दडले आहे का, अशी शंका येते, असेही हत्तीकर यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;