T20 WC 2024 : सर्वात मोठा उलटफेर, सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेचा पाकिस्तानवर विजय

T20 WC 2024 : सर्वात मोठा उलटफेर, सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेचा पाकिस्तानवर विजय

अमेरिका आणि पाकिस्तान संघात डलासमधील ग्रँड प्रेयरी मैदानावर यंदाच्या टी20 वर्ल्डकपमधील अकरावा सामना खेळला गेला. सुपर ओव्हरपर्यंत गेलेल्या या लढतीत यजमान अमेरिकेने पाकिस्तानचा पराभव करत सर्वात मोठ्या उलटफेराची नोंद केली. सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेने पाकिस्तानसमोर 19 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र पाकिस्तानचा संघ 13 धावाच करू शकला आणि अमेरिकेने यंदाच्या स्पर्धेतील दुसऱ्या विजयाची नोंद केली. तर दुसरीकडे या पराभवामुळे साखळी फेरीतूनच गाशा गुंडाळण्याची नामुश्की पाकिस्तानवर ओढवू शकते.

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकात 5 विकेट्स गमावून 159 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना अमेरिकेचा संघही निर्धारित षटकांमध्ये 3 विकेट्स गमावून 159 धावा करू शकला. त्यानंतर सामन्याचा निकाल लावण्यासाठी सुपर ओव्हर घेण्यात आली.

सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेचा आरोन जोन्स आणि हरमीत सिंग फलंदाजीला उतरले. दोघांनी 6 चेंडूत 18 धावा करत पाकिस्तानपुढे विजयासाठी 19 धावांचे आव्हान ठेवले. या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला पाकिस्तानचा संघ 6 चेंडूत फक्त 13 धावा करू शकला. अमेरिकेच्या सौरभ नेत्रवालकर याने टिच्चून गोलंदाजी करत पाकिस्तानला जखडून ठेवले आणि संघाला विजय मिळवून दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;