नताशाच्या ‘या’ नव्या फोटोमुळे हार्दिकसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांना लागणार पूर्णविराम?

नताशाच्या ‘या’ नव्या फोटोमुळे हार्दिकसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांना लागणार पूर्णविराम?

नताशाच्या ‘या’ नव्या फोटोमुळे हार्दिकसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांना लागणार पूर्णविराम?

क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री नताशा स्टॅन्कोविक यांच्या वैवाहिक आयुष्यात समस्या सुरू असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. हे दोघं घटस्फोट घेणार असल्याचं म्हटलं जातंय. नताशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ‘पांड्या’ हे आडनाव काढून टाकल्याने आणि हार्दिकसोबतचे काही फोटो डिलिट केल्याने या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र या सर्व चर्चांबद्दल दोघांनीही अद्याप मौन बाळगलं आहे. अशाच नताशाच्या सोशल मीडिया ॲक्टिव्हिटीमुळे पुन्हा एकदा ही जोडी चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी तिने हार्दिकसोबतच्या लग्नाचे आणि इतरही काही फोटो इन्स्टाग्रामवर ‘अनआर्काइव्ह’ केले. आर्काइव्ह केल्याने प्रोफाइलवरील फोटो इतरांना दिसत नाहीत. मात्र पुन्हा ते अनआर्काइव्ह केल्यास त्याच तारखेला आणि वेळेला ते पोस्ट दिसून येतात. त्यानंतर आता नताशाने आणखी एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट केला आहे. ज्यानंतर हार्दिक पांड्यासोबत सर्वकाही ठीक असल्याचं म्हटलं जात आहे.

नताशाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पाळीव श्वानाचा फोटो पोस्ट केला आहे. नताशाच्या पाळीव श्वानाने गुलाबी रंगाचा टी-शर्ट घातल्याचं पहायला मिळतंय. मात्र या सगळ्यात त्या फोटोवर लिहिलेल्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. तिने लिहिलंय, ‘बेबी रोवर पांड(या)’. हे वाचून नेटकरी असा अंदाज वर्तवत आहेत की नताशा अद्यापही हार्दिक पांड्यासोबतच आहे. हार्दिक आणि नताशा यांच्या नात्याचं सत्य ते दोघंच सांगू शकतील. मात्र सध्या नताशाच्या या फोटोने पुन्हा एकदा त्यांची चर्चा घडवून आणली आहे.

नताशाने पोस्ट केलेला फोटो-

हार्दिक आणि नताशाने 2020 मध्ये लॉकडाऊनदरम्यान गुपचूप लग्न उकरलं होतं. लग्नाच्या दोन महिन्यांतच नताशाने मुलगा अगस्त्यला जन्म दिला. त्यानंतर गेल्या वर्षी 14 फेब्रुवारी रोजी हार्दिक आणि नताशाने पुन्हा एकदा ख्रिश्चन विवाहपद्धतीनुसार लग्न केलं. या लग्नात त्यांचा चिमुकला मुलगासुद्धा सहभागी झाला होता.

घटस्फोटाच्या चर्चांनंतर नताशाला मॉडेल आणि फिटनेस ट्रेनर ॲलेक्झांडर ॲलेक्स इलिकसोबत पाहिलं गेलं होतं. यानंतर त्याच्यामुळे हार्दिक आणि नताशाच्या नात्यात कटुता आल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र ॲलेक्झांडर हा अभिनेत्री दिशा पटानीचा बॉयफ्रेंड असल्याचं नंतर स्पष्ट झालं. टायगर श्रॉफसोबत ब्रेकअप झाल्यानंतर दिशा तिचा फिटनेस ट्रेनर ॲलेक्झांडरला डेट करतेय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;