भाजपच्या माजी नगरसेवकाकडून शिंदे गटाच्या शाखा प्रमुखाला मारहाण
रत्नागिरी शहरातील विठ्ठल मंदिर परिसरात शिंदे गटाच्या शाखाप्रमुखाला भाजपाच्या माजी नगरसेवकांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याबाबतची तक्रार शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
शहरातील नवीन भाजी मार्केट परिसरात राहणारे शिंदे गटाचे शाखाप्रमुख मिलिंद देवरुखकर व विठ्ठल मंदिर परिसरात राहणारे भाजपाचे माजी नगरसेवक राजेश तोडणकर व त्यांचे बंधू परेश तोडणकर याच्यात काही कारणांनी वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले अन शाखाप्रमुख मिलिंद देवरुखकर यांना भाजपचे माजी नगरसेवक राजु तोडणकर व त्याचे बंधू परेश तोडणकर यांनी मारहाण केली. याची तक्रार मिलिंद देवरुखकर यांनी बुधवारी रात्री उशिरा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
भाजपचे माजी नगरसेवक राजेश कृष्णा तोडणकर व त्याचे भाऊ परेश कृष्णा तोडणकर यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून भादवि 451, 324, 323, 504, 34 प्रमाणे राजेश तोडणकर व भाऊ परेश तोडणकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List